शेतकऱ्यांसाठी केले दफनविधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:10+5:302021-08-28T04:21:10+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथे बहुजनमुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दफनविधी आंदोलन ...
मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथे बहुजनमुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दफनविधी आंदोलन करण्यात आले.
पी. एम. किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० हजार शेतकरी वंचित आहेत. मागील वर्षी केळीवर सीएमव्ही नावाचा व्हायरस आला होता. त्या व्हायरसमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अरबो रुपयांचे नुकसान झाले होते. मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले ती भरपाईसुद्धा आद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात दफनविधी आंदोलन पार पडले.
जिल्हा प्रशासनाकडून मुक्ताईनगरचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, वानखेडे यांनी तत्काळ सर्व कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
यावेळी आंदोलनकर्ते प्रमोद सोंदळे, ब्रिजलाल इंगळे तसेच शेतकरी, सुरेश पाटील, शैलेश पाटील, कमिल रौफ, गौतम प्रधान, संजय बुवा, सचिन चौधरी, एकनाथ पाटील, एन. टी. महाजन, विवेक पोहेकर, उल्हास पाटील, पवन वानखेडे, मुकेश तायडे, किशोर महाजन, राम सोनार, वैभव पाटील, शांताराम बेलदार, रघुनाथ पोहेकर आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंके, तालुका कृषी अधिकारी माळी, गोपनीयचे गणेश मनुरे, मंगल साळुंके, हेमंत पाटील, विठ्ठल धनगर, शकीर शेख, पंकज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
नायगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दफनविधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विवेक सोनवणे, प्रमोद सौंदळे, ब्रिजलाल इंगळे व बंदोबस्तावर असलेले पोलीस. (छाया: विनायक वाडेकर)