‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने भाजली हाताची त्वचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:45 PM2020-05-26T18:45:31+5:302020-05-26T18:46:52+5:30

‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने हाताची त्वचा भाजल्याची घटना घडली.

Burnt hand skin due to ‘Home Quarantine’ stamp | ‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने भाजली हाताची त्वचा

‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने भाजली हाताची त्वचा

Next
ठळक मुद्देतरुण खंडाळा येथीलकिन्ही आरोग्य केंद्रात मारला होता शिक्का

भुसावळ, जि.जळगाव : गुजराथेतून आपल्या गावी खंडाळा, ता.भुसावळ येथे परतल्यानंतर ‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारल्याने हाताची त्वचा भाजल्याची घटना सोमवारी सकाळी किन्ही, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर खंडाळा गावातील तरूण समाधान अरुण चौधरी हा अहमदाबाद (गुजरात) येथे अडकला होता. २५ रोजी सकाळी ११ वाजता तो खासगी वाहनाने गावी आला. मात्र गावात प्रवेश करण्याआधी ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्याच्या सूचना करण्यात आल्या. किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात तो गेल्यानंतर हातावर ‘होम क्वॉरंटाईन’चा शिक्का मारण्यात आला. मात्र अवघ्या काही तासात त्याच्या हाताला सूज आली. हातावरील त्वचा भाजल्यासारखी निघाली. यानंतर परत किन्ही आरोग्य केंद्राची संपर्क साधून कैफियत सांगण्यात आली. किन्ही आरोग्य केंद्रातून त्यांनी हाताला लावण्यासाठी औषधी दिली. मात्र अजूनही या तरुणाच्या हाताला आग होत आहे.
याविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता दवंगे-पांढरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी प्रमोद पांढरे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘अ‍ॅलर्जिक बाब आहे. तेल व मलम लावल्याने भाजलेल्या त्वचेस आराम मिळेल.’

Web Title: Burnt hand skin due to ‘Home Quarantine’ stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.