बस आणि कंटनेरचा अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:12+5:302021-07-04T04:13:12+5:30

भुसावळ/ दीपनगर : वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या वाशिम -सुरत या लक्झरी बसला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुरत येथील एक ...

Bus and container crash, one killed | बस आणि कंटनेरचा अपघात, एक ठार

बस आणि कंटनेरचा अपघात, एक ठार

Next

भुसावळ/ दीपनगर : वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या वाशिम -सुरत या लक्झरी बसला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुरत येथील एक प्रवासी ठार झाला तर नऊ जण जखमी झाले. हा अपघात ३ रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास वरणगावजवळील कपिलनगर वस्तीजवळ झाला. ही धडक एवढी जोरात होती की, लक्झरी बसचा बराचशा भागाचा अक्षरश: चुराडा झाला. सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून वेळोवेळी वळण रस्ते केले जात असल्यामुळे अनेक वाहनांना अंदाज येत नाही. वरणगावकडून भुसावळकडे एकतर्फी सुरू असलेल्या रस्त्यावरून वाशिमकडून सुरतला लक्झरी बस( क्रमांक जी जे-१७-ओयू-०३४) ने येत असलेला कंटेनर (क्रमांक सीजी-०४-००५९) याच्यात जोरदार धडक झाली. हा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील रहिवासींच्या मनात धडकी भरली होती. लक्झरी बसमध्ये गाढ झोपेत असलेले सैयद अकबर सैयद उस्मान(५०, मिठी खाडी, उधना सुरत, गुजरात) यांचा मृत्यू झाला. जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.दरम्यान रात्री घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी व सहकाऱ्यांनी धाव घेतली व अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

चिखली ते तरसोद दरम्यान महामार्गावर गेल्या पंधरा दिवसात तब्बल चौदा ते पंधरा लोकांना अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला. आहे. या कालावधीत सिंधी कॉलनीतील दोन सख्ख्या भावांचा तर ग्रीन पार्क येथील दोघा जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी उड्डाणपुलावर असलेले पथदिवे त्वरित सुरू करावे व वळण रस्त्याच्या ठिकाणी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही. रात्रीच्या वेळेस कर्मचारी नियुक्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातप्रकरणी सैयद फारुख सैयद उस्मान (रा. मिठी खाडी, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील जखमींची नावे

१) शेख सुभान शेख उस्मान (वय ५८, रा. मालदा, जि. अकोला) २) तुळशीराम अंबर बठेरे (वय ५५, रा. मंगरूळपीर, जि.वाशिम) ३) अरविंद प्रवीण डोंगरे (वय १९, रा. मजलापूर.................., जि. अकोला) ४) परीक्षित साहेबराव डोंगरे (वय २०, रा. मजलापूर...................., जि. अकोला)

५) विमल ज्ञानदेव गिरे (वय ४३, रा. निमगाव, जिल्हा बुलडाणा)

६) लक्झरीचा क्लीनर विशाल एकनाथ बाविस्कर (वय २१, रा. घाटनादरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) (लक्झरी क्लीनर).

७) जगदीश भारत मेश्राम (वय १९, ल रा................... दारव्हा, जि. यवतमाळ)

८) लक्झरी चालक अशोक नथ्थुलाल पटेल (वय ४०, रा. सुरत)

९) शेख रिजवान शेख अब्दुल (वय २१, रा. खामगाव, जि. बुलडाणा)

Web Title: Bus and container crash, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.