रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी आल्यास बसची सुविधा - जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:34 PM2020-03-28T12:34:06+5:302020-03-28T12:34:40+5:30

लॉक डाऊनमध्येही खाजगी दवाखाने सुरू ठेवून सेवा द्या

Bus facility for hospital staff - District Collector's signal | रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी आल्यास बसची सुविधा - जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी आल्यास बसची सुविधा - जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

Next

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली रुग्णसेवा बंद न करता नियमित सुरु ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. या वेळी आयएमए पदाधिकाºयांनी कर्मचाºयांना रुग्णालयात येण्यास अडचण येत असल्याचा मुद्दा मांडला असता एकाच मार्गावर जास्त कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे संकेत जिल्हाधिकाºयांनी दिले.
लॉकडाऊनच्या काळात अनेक खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनमध्ये शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद पाटील यांच्यासह खाजगी डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले, खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यामुळे साधा थंडी, ताप, खोकल्यासाठी रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत आहे. त्यामुळे तेथे मध्ये गर्दी वाढत आहे. ही गर्दी टाळणे आवश्यक असून दवाखाने सुरू ठेवा, रुग्णांवर उपचार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या. ज्या रुग्णाला कोरोना सदृष्य लक्षणे असल्याचे आढळून आले तरच त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवा, साध्या रुग्णांवर स्थानिक पातळीवरच उपचार होणे आवश्यक असल्याचे सांगून कोरोना वाढणार नाही यासाठी आपले दवाखाने सुरूच ठेवा, असेही त्यांनी सूचित केले.
अधिक कर्मचारी असतील तर बसची व्यवस्था
आयएमए च्या पदाधिकाºयांनी दवाखाने सुरू ठेवायला व नर्सिंग स्टाफला दवाखान्यात येण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले. स्टाफला दवाखान्यात येताना अडचण येवू नये यासाठी त्यांना ओळखपत्र द्या व ते त्यांनी गळ््यात घालूनच बाहेर पडायला सांगा त्यामुळे त्यांना पोलीस अडविणार नाही, असेही जिल्हाधिकाºयांनी सूचविले. रिक्षा सुरू आहेत, त्यामुळे त्यांना अडचणी येणार नाही. तसेच एकावेळी एकाच मार्गावर अधिक कर्मचारी येत असतील तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करू अशी ग्वाही देत येणाºया सर्व अडचणी प्रशासन सोडविल, असेही त्यांनी नमूद केले.
आवश्यक सुविधांसह ५०० खाटांची तयारी
सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी २० खाटा (बेड) राखीव आहे. गोदावरी रुग्णालयातही व्यवस्था आहे. शहरात विविध ठिकाणी आवश्यक सुविधांसह ५०० खाटांची (बेड) तयारी आहे. शासकीय वसतिगृहांची पाहणी करून त्यातही व्यवस्था केली जात असून गंभीर परिसस्थिती उद््भवली तर खासगी डॉक्टरांची मदत घेवू, असेशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली.
सर्वांनी काळजी घ्या
दवाखान्यात हात धूण्यासाठी बेसीन बसवा, सॅनिटायझरचा वापर करा, रुग्णांना सोशल डिस्टन्स राखूनच दवाखान्यात बसवा, स्टाफला मास्क वापरायला सांगा, वापरलेले मास्क इतरत्र टाकू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
आयएमएच्या पदाधिकाºयांनीही कोरोनोबाबत शासनाला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. गरज भासल्यास बेड, व्हेंटिलेटर, मॉनिटरही उपलब्ध करुन देवू, असे सांगत प्रशासनास सहकार्य करण्याची ग्वाही सर्व डॉक्टरांनी दिली.

Web Title: Bus facility for hospital staff - District Collector's signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव