पहिल्याच दिवशी बस, रेल्वे हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:57+5:302021-06-09T04:19:57+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : नाशिक, धुळे, चाळीसगाव मार्गावर प्रवाशांची गर्दी जळगाव : लॉकडाऊनमुळे महिना भरापासून बंद असलेली लालपरीची चाके सोमवार ...

Bus on the first day, train housefull | पहिल्याच दिवशी बस, रेल्वे हाऊसफुल्ल

पहिल्याच दिवशी बस, रेल्वे हाऊसफुल्ल

Next

उत्स्फूर्त प्रतिसाद : नाशिक, धुळे, चाळीसगाव मार्गावर प्रवाशांची गर्दी

जळगाव : लॉकडाऊनमुळे महिना भरापासून बंद असलेली लालपरीची चाके सोमवार पासून पुन्हा सर्वदूर धावायला लागली आहेत. पहिल्याच दिवशी नाशिक, धुळे, चाळीसगाव मार्गावर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला असून, दुसरीकडे राज्यभरात अनेक शहरातील लॉकडाऊन उठविल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेला मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.

कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्व सामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र,शासनाने ७ जून पासून लॉकडाऊन मधील शिथिलता पुर्णतः शिथिल केल्यामुळे जळगाव आगारातर्फे पुन्हा सोमवार पासूबा पूर्वीप्रमाणे बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. तसेच बस मधील ५० टक्के प्रवाशी क्षमतेची अटही रद्द केल्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई व पुण्यातही लॉक डाऊन पुर्णतः उठविल्याने या शहरात रोजगार-व्यवसाय निमित्त स्थानिक नागरीकांची व पर राज्यातील नागरीकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या गर्दीने भरून जात असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत लॉकडाऊन मधील शिथिलता उठविल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. यामुळे पुन्हा बस व रेल्वेला पहिल्या सारखी गर्दी दिसून येत आहे.

इन्फो :

शासनाने सोमवारपासून लॉकडाऊन मधील शिथिलता पूर्णपणे उठविल्याने, सकाळ पासूनच नाशिक, धुळे व औरंगाबाद मार्गावर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आगारातर्फे पुणे, मुंबई मार्गावरही बसेस सोडण्यात आल्या आहेत. जसजसा प्रवाशांची संख्या वाढेल,त्यानुसार बस फेऱ्या वाढविण्यात येतील.

नीलेश पाटील, आगार व्यवस्थापक,जळगाव आगार

शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर रेल्वेने पुणे,मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. आता लॉकडाऊन मध्ये पुर्णतः शिथिलता आणल्यामुळे प्रवाशांची संख्या आणखीच वाढणार आहे. यामुळे रेल्वे बोर्डातर्फे स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

अमरचंद अग्रवाल, स्टेशन प्रबंधक,जळगाव रेल्वे स्टेशन

इन्फो :

रेल्वेला मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

राज्य शासनाने लॉकडाऊन मधील शिथिलता उठविल्यानंतर रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. स्थानिक प्रवाशांसह परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गाड्यांना गर्दी दिसून येत आहे. या मध्ये विदर्भ एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, व हावडा एक्स्प्रेस, या गाड्यांना गर्दीमुळे अनेक प्रवाशांची तिकिटे प्रतीक्षा यादीत रहात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.

इन्फो :

बसला नाशिक, धुळे मार्गावर गर्दी

सोमवार पासून पुर्णतः लॉकडाऊन उठविण्यात आल्याने जळगाव आगारातर्फे नाशिक, पुणे, कल्याण, औरंगाबाद, धुळे यासह जिल्हा अंतर्गतही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये नाशिक व धुळे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. सध्या लग्नसराईचे दिवसही सुरू असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले. धुळे व नाशिक नंतर औरंगाबाद, चाळीसगाव या मार्गावरही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

जिल्हा परिषदेत महत्वाचे काम असल्याने चाळीसगावहून जळगावला जात आहे. लॉकडाऊनमुळे महामंडळाची बस सेवा बंद असल्याने, जळगावहुन परत येतांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र,आता बस पुन्हा सुरू झाल्याने जळगावहुन तातडीने घराकडे परत येता येणार आहे.

छोटुलाल चौधरी,प्रवाशी

लॉकडाऊन नंतर जळगावची बाजारपेठ उघडल्याने रेल्वेने पाचोऱ्याहुन जळगावला जात आहे.दुकानात माल नसल्याने, व्यवसायावर परिणाम होत होता. त्यामुळे मला घेण्यासाठी जळगावला जावे लागत आहे.

संजय पाटील, प्रवाशी

रेल्वेने लवकर तिकीट आरक्षित होत नसल्याने, पाचोऱ्याहून बसने जळगावला आलो. जळगावला सौदर्य प्रसाधनाच्या वस्तूंचा माल कमी दरात मिळत असल्याने,या वस्तू खरेदीसाठी नेहमी जळगावला यावे लागते. आता बस सुरू झाल्याने जळगावला येणे सोयीचे झाले आहे.

योगेश पाटील, प्रवाशी

मी एका कंपनीत बी-बियाणेचे मार्केटिंग करतो. बस बंद असल्यामुळे दुचाकीवर फिरावे लागत होते. मात्र, सोमवार पासून आता पुन्हा बससेवा सुरू झाल्यामुळे मार्केटिंग करणे सोपे झाले आहे. तसेच दुचाकीवर फिरण्याचा त्रासही वाचला आहे. नितीन सैदाने, प्रवाशी

Web Title: Bus on the first day, train housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.