बसअभावी विद्यार्थ्यांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:11 PM2019-11-19T21:11:37+5:302019-11-19T21:11:52+5:30
दापोरा, ता. जळगाव : अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट ...
दापोरा, ता.जळगाव : अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे, अशा स्थितीत मोहाडी व धानोरा येथे सुरू असलेली सिटी बस सेवा दापोऱ्या पर्यंत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे़ याबाबत जळगाव विभागाचे आगार प्रमुख व आगार नियंत्रक यांना भेटून निवेदन देण्यात आले.
दापोरा येथे काही वषार्पूर्वी नियमित दिवसातून तीन बसफेºया सुरू होत्या, मात्र त्या बंद असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़
ग्रामस्थाना बस नसल्याने पायीच शिरसोली येवून आपली कामे करावी लागतात. तीन किमी अंतरावर धानोरा आहे व रस्ता देखील सुस्थितीत आहे़ दापोरा ते जळगाव हे अंतर धानोरामार्गे दहा किमी आहे. त्यामुळे सिटी बस सेवा दापोºया पर्यंत सुरू केल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे़
जळगावी येणारे जवळपास शंभर विद्यार्थी शिरसोली येथे पायी जाऊन येथून बस ने शाळेत जातात़ सिटी बस सेवा सुरू झाल्यास जळगावी जाणारे ग्रामस्थ, विद्यार्थी, शिरसोली रेल्वे स्थानकावर जाणारे धानोरा व दापोरा येथील प्रवशांची सोय होणार आहे. असे निवेदनात नमूद आहे़
याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.