चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्यावर बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 04:31 PM2019-08-30T16:31:31+5:302019-08-30T16:34:08+5:30

गतिरोधकावर बस वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चाळीसगाव-राहीपुरी बस रस्त्याच्या कडेला उलटली. भोरस फाट्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली.

The bus overturned at Bhoras Ghat in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्यावर बस उलटली

चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्यावर बस उलटली

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने जीवित हानी टळलीबसमध्ये होते १७ प्रवासीचार-पाच प्रवासी किरकोळ जखमी

करगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : गतिरोधकावर बस वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चाळीसगाव-राहीपुरी बस रस्त्याच्या कडेला उलटली. भोरस फाट्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. बसमधील १७ प्रवासी बचावले. चार-पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले.
चाळीसगाव-राहीपुरी (क्रमांक एमएच-२०-बीएल-२२८२) ही बस सकाळी ९.४५ वाजता चाळीसगाव येथून निघते. त्यानंतर ती करगाव, वडगाव लांबे मार्गे राहीपुरी येथे जाते. ही बस चाळीसगाव येथून येत असताना गतिरोधकावर हळू झाल्यानंतर करगावकडे वळत होती. तेव्हा मागून गुजरात पासिंगची आठ टायर असलेली ट्रक येत होती. हा सोलापूर महामार्ग क्रमांक २११ आहे. ट्रकचालकाला याचा अंदाज न आल्याने त्याने पुढे धावणाºया बसला एका बाजूने ठोकून दिल्याने ती एका बाजूने उलटली. सुदैवाने येथे छोटा पूल होता. यामुळे दोन फूट उंच भिंत असल्याने एकीकडचे बसचे टायर अडकल्याने ती उलटली नाही. या बसमध्ये १७ प्रवाशी होते. यातील चार-पाच जण किरकोळ जखमी झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा गतिरोधक चाळीसगावकडून धुळ्याकडे जाताना चार ते पाच फुटांवरच घेतला आहे. हा जर १० फुटांवर घेतला असता तर हा अपघात झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गतिरोधक जवळ असल्याने मागून येणाºया गाड्यांना येथे वळण आहे का नाही हे लक्षात येत नाही.
 

Web Title: The bus overturned at Bhoras Ghat in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.