बसमधून प्रवाशाचे ४० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:34 PM2018-11-06T12:34:40+5:302018-11-06T12:34:51+5:30

गर्दीचा गैरफायदा

The bus passes 40 thousand passengers | बसमधून प्रवाशाचे ४० हजार लांबविले

बसमधून प्रवाशाचे ४० हजार लांबविले

Next
ठळक मुद्देतक्रार घेण्यास नकार

जळगाव : गर्दीचा फायदा घेत आव्हाणे येथील नंदकिशोर नामदेव वाणी (वय ४०) या प्रवाशाच्या खिशातील ४० हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याबाबत वाणी यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. मात्र पैसे चोरी झालेले नाहीत, तर खिशात ठेवतानाच ते पडल्याचे सांगून पोलिसांनी तक्रार घेतली नाही.
नंदकिशोर वाणी हे सोमवारी औरंगाबादला जाण्यासाठी आव्हाणे येथून कानळदा बसमधून जळगाव स्थानकावर आले. औरंगाबादला जात असताना आर.एल चौकाजवळ पॅँटच्या खिशातील ४० हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथेच उतरुन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. पॅँटच्या चोर खिशात ही रक्कम ठेवली होती.
खिसा फाटलेला नाही किंवा कापलेला नाही. तसेच शर्टाच्या खिशात सातशे रुपये सुरक्षित होते. त्यामुळे या पैशांची चोरी झालेली नाही असे पोलिसांनी वाणी यांना सांगितले. त्यामुळे त्यांची तक्रारही घेण्यात आली नाही.
 

Web Title: The bus passes 40 thousand passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.