मजरेहिंगोणे पुलालगतचा भराव वाहून गेल्याने बससेवा बंद
By admin | Published: June 12, 2017 12:32 PM2017-06-12T12:32:39+5:302017-06-12T12:32:39+5:30
विद्यार्थी व ग्रामस्थांचे होत आहेत हाल.
Next
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.१२ - दमदार पावसामुळे मजरेहिंगोणे व मौजे हिंगोणे या गावालगतच्या फरशी पुलालगतचा मातीचा भराव वाहनू गेल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या गावाला जाणारी बससेवा बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.
चोपडा-लासूर मार्गावर मजरेहिंगोणे, मौजेहिंगोणे ही गावे आहेत. या गावालगत असलेल्या नाल्यावर दोन पूल बांधण्यात आले आहेत. या मार्गे एस.टी.महामंडळाच्या बसच्या पाच फेºया होत असतात.
७ रोजी या परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे अकुलखेडा फाटा ते मौजे हिंगोणे पर्यंत जाणाºया रस्त्यावरील दोन्ही नाल्यावरील फरशी पुलाजवळील मातीचा भराव वाहून गेले. त्यामुळे या मार्गे जाणारी लासुर येथे जाणारी बस बंद झाली. मौजे हिंगोणे व मजरे हिंगोणे या दोनही गावांना बस येत नसल्याने, प्रवाशांचे हाल होऊ लागले.