अमळनेरात रेल्वे बोगद्याजवळील पाण्यात अडकली बस
By admin | Published: June 23, 2017 05:11 PM2017-06-23T17:11:23+5:302017-06-23T17:11:23+5:30
दोन तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने काढली बस
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.23- शहरातील रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात बस बंद पडल्याने, त्या बसमध्ये 35 विद्याथ्र्यासह प्रवाशीही अडकले होते. तब्बल पावणे दोन तासानंतर क्रेनच्या साह्याने ही बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली.
शहरात शुक्रवारी दुपारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्यांना पाणी आले. ते पाणी रेल्वे बोगद्याखाली साचले. दुपारी 2 वाजेच्यासुमारास अमळनेर-करणखेडा बस (एमएच 07-सी7828) ही बोगद्याखाली आली, त्यावेळी पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे बस बोगद्यातच बंद पडली. बसमध्ये शाळेच्या विद्याथ्र्यासह 35 जण अडकले होते. तब्बल पावणे दोनतास ही बस बोगद्यात अडकून पडली होती.तहसीलदार प्रदीप पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी ताबडतोब पोलिसांना व नगरपालिका कर्मचा:यांना घटनास्थळी पाठविले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास रेल्वेची क्रेन मागवून पोलिसांच्या मदतीने बस बोगद्यातून बाहेर काढण्यात आली. पोलीस सुनील हटकर , प्रमोद बागडे, जे डी पाटील, प्रमोद पाटील, बापू रंगराव पाटील, यांच्यासह तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी मदत केली.