बसेस रोखल्या, वाहतूक ठप्प
By admin | Published: February 11, 2017 12:28 AM2017-02-11T00:28:56+5:302017-02-11T00:28:56+5:30
भिवंडी घटनेचा निषेध : दोषींवर कठोर कारवाई करण्याची कर्मचाºयांची मागणी
भुसावळ : भिवंडी आगारातील एसटीचालक प्रभाकर गायकवाड यांचा रिक्षाचालकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी दुपारी २० मिनिटे आगारातील बसेस रोखत घोषणाबाजी केली़
भिवंडी बसस्थानकाच्या गेटजवळ रिक्षाचालकांनी मारहाण केल्याने एसटीचालक गायकवाड यांचा मृत्यू झाला़ ही घटना अत्यंत अमानुष व निंदनीय असल्याचे कर्मचाºयांनी नमूद करीत घोषणाबाजी केली़
सर्व संघटनाशिवाय कर्मचारी सहभागी झाले. त्यात प्रामुख्याने एसटी कामगार संघटना, इंटक संघटना, कामगार सेना व कास्ट्राईब युनियनचे सर्व कर्मचारी हजर होते.
आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात कर्मचाºयांना संरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. मृत एसटीचालक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करून एसटी बसेस पूर्ववत सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, विभागातील स्थानकांवरही गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़
अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी , गायकवाड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, दोनशे मीटर झोनची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़
४एसटी कर्मचाºयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आगारप्रमुखांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली़