जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासून व्यवसायास दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 10:42 PM2021-05-31T22:42:12+5:302021-05-31T22:42:12+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांना शिथीलता देत १ जून पासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह स्वतंत्र ठिकाणी असलेल्या इतर दुकानांनाही ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांना शिथीलता देत १ जून पासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह स्वतंत्र ठिकाणी असलेल्या इतर दुकानांनाही व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असून अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने शनिवार-रविवार बंद ठेवावी लागणार आहेत. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी काढले. या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी व विशेष निर्बंध १५ जून पर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. हे आदेश काढत असताना अत्यावश्यक सेवेतील दुकानांना तीन तास वाढीव वेळ देण्यात आली असून इतर व्यवसायांच्या दुकानांना सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र सलून, स्पा, जिम हे पूर्णपणे बंद राहणार असून दुपारी दोन वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कृषीशी निगडित दुकानांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत परवानगी देण्यात आली असून मॉर्निंग वाॅक, सायकलिंग, खुल्या मैदानावर व्यायाम याकरिता पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत सुटणार आहे.