जळगावात विक्रीकर भवनासमोर व्यापा:यांचे सत्याग्रह आंदोलन
By Admin | Published: May 4, 2017 02:51 PM2017-05-04T14:51:34+5:302017-05-04T14:51:34+5:30
विक्रीकर कार्यालयासमोर व्यापा:यांतर्फे गुरुवारी सकाळी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
जळगाव,दि.4- विक्रीकर विभागाची ऑनलाईन विक्री कर व इतर विवरणे भरण्याची व्यवस्था अनेक तांत्रिक अडचणींमुळे योग्यरित्या काम करीत नाही. याविषयी विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांकडे तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने विक्रीकर कार्यालयासमोर व्यापा:यांतर्फे गुरुवारी सकाळी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
विक्रीकर विभागाची ऑनलाईन यंत्रणा काम करीत नसल्यामुळे संबंधितांना अनावश्यक दंडाचा भुदर्ंड बसणार आहे. या संदर्भात विक्रीकर विभागाचे सहआयुक्त डी.एल.भंडारे यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आमदार सुरेश भोळे यांनी देखील व्यापा:यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले. दुपारी 12.30 वाजेर्पयत हे आंदोलन सुरुच होते. या सत्याग्रहात जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव उद्योजक संघटना आणि विक्रीकर सल्लागार संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.