कामावर जाणाऱ्या व्यावसायीकाला मालवाहू वाहनाने उडविले; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ

By Ajay.patil | Published: March 28, 2023 02:20 PM2023-03-28T14:20:58+5:302023-03-28T14:21:41+5:30

जागीच मृत्यू: ममुराबाद रस्त्यावरील घटना; दुसरा जखमी

businessman on his way to work was hit by a cargo vehicle | कामावर जाणाऱ्या व्यावसायीकाला मालवाहू वाहनाने उडविले; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ

कामावर जाणाऱ्या व्यावसायीकाला मालवाहू वाहनाने उडविले; तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ

googlenewsNext

जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळ छोटी मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश गणपत कुंभार-हिवरकर (वय-४०, रा. चौघुले प्लॉट,, जळगाव) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुरेश कुंभार यांची ममुराबादला विटभट्टीचा व्यवसाय आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता सुरेश कुंभार हे आपल्या मित्र दिलीप कुंभार यांच्यासोबत दुचाकीने (एम.एच. ४१ एच. ९९८१) निघाले होते. घरापासून अवघ्या २ किमी अंतर पार केले असतानाच, रस्त्यावरील मनुदेवी मंदीराजवळच  चोपड्याकडून जळगावकडे बैलजोडी घेवून येणाऱ्या छोट्या मालवाहतूक (एम.एच. १९ सी.वाय. ८१७३) करणाऱ्या वाहनाने सुरेश कुंभार यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात सुरेश कुंभार हे जागेवरच ठार झाले. तर सोबत असलेले दिलीप कुंभार हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ममुराबाद ग्रामस्थांनी धाव घेत जखमीला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने हळहळ

सुरेश कुंभार हे पत्नी मनिषा, एक मुलगी व दोन मुलांसोबत चौघुले प्लॉट येथे वास्तव्याला होते. विटभट्टीचा व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. वडिल गणपत कुंभार हे देखील त्यांना व्यवसायात मदत करत होते. अंत्यंत मेहनती असलेल्या सुरेश कुंभार यांना तीन बहिणी असून, तिघा बहिणींचा एकुलता एक भावाचा अचानक अपघातामुळे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. सुरेश कुंभार यांना एक मुलगी असून, मुलगीचे १२ वी ची परीक्षा संपली आहे. तर एक मुलगा दहावीत तर दुसरा मुलगा आठवीत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: businessman on his way to work was hit by a cargo vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.