नाफेड करणार मूग, उडीद खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 09:24 PM2017-10-13T21:24:13+5:302017-10-13T21:28:00+5:30

आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतक:यांचा मूग, उडीद खरेदीसाठी अमळनेर, पाचोरा, जळगाव कृउबांची केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.

Buy Nauded Moong, Udiid | नाफेड करणार मूग, उडीद खरेदी

नाफेड करणार मूग, उडीद खरेदी

Next
ठळक मुद्देऑनलाईन करावी लागणार नोंदणीमुगला 5575 तर उडदाला 5400 रुपये क्विंटलला भाव

लोकमन ऑनलाईन अमळनेर, दि.13 : कडधान्य आधारभूत किंमत योजनेंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बोनससह मूग 5,575 तर, उडीद 5400 रुपये प्रति क्विंटलने नाफेड खरेदी करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती उदय वाघ यांनी सांगितले. अमळनेरसह पाचोरा, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांची या साठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर योजनेचा शेतक:यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी शेतक:यांनी आधारकार्डची मूळ प्रत, बँकेच्या पासबूकची नक्कल व पिकपेरा लावलेला सात बारा उतारा द्यायचा आहे. सदरची नोंदणी शेतकी संघात करायची असून स्वत: वापरत असलेला मोबाईल फोन नंबर देवून त्यावर एसएमएसद्वारे टोकन मिळणार आहेत. या साठी नाफेडतर्फे ग्रेडर म्हणून प्रशांत कामराज पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. मूग, उडीद हे कडधान्य आणतांना आद्र्रता 12 पेक्षा जास्तीची नसावी. नोंदणीची ही ऑनलाईन प्रक्रिया 3 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्यात नाफेडने पाचोरा, अमळनेर व जळगाव ह्या बाजार समितीची खरेदीसाठी निवड केली असून या हंगामातील उडीद व मूग शेतक:यांनी वरील बाजार समितीत 21 डिसेंबरपयर्ंत आणावा असे आवाहनही बाजार समितीचे सभापती उदय वाघ यांनी केले आहे.

Web Title: Buy Nauded Moong, Udiid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.