विद्यार्थी निवडणुकांचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:35 AM2019-08-01T11:35:52+5:302019-08-01T11:37:01+5:30
७ सप्टेंबरला खान्देशातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान : २३ सप्टेंबरला विद्यार्थी परिषदेची होणार निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यात ७ सप्टेंबर २०१९ रोजी मतदान होईल. तर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होईल.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सत्यजित साळवे यांनी बुधवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या विद्यार्थी परिषद निवडणूकी करीता सन २०१९-२० या शैक्षणिक वषार्साठी विद्याथ्यार्चा पुर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश अनिवार्य असून २० आॅगस्ट, २०१९ पर्यंत विद्याथ्यार्चा या अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असावा.
विद्यार्थी संघटनांकडून मोर्चेबांधणीला वेग
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुल्या निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटनाकडून शासनाकडे मागणी केली जात होती. अखेर नवीन विद्यापीठ कायद्यात विद्यार्थ्यांच्या खुल्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठात खुल्या विद्यार्थी निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचे सर्व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून, या निवडणुकांसाठी आता विद्यार्थी संघटनांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अनेक संघटनांनी महाविद्यालयांमध्ये आधीच सदस्य नोंदणीच्या कामाला सुरुवात केली असून, निवडणूक जवळ आल्यामुळे महाविद्यालयाचे वातावरण तापणार आहे.
२३ आॅगस्ट रोजी अधिसूचना
निवडणुकीची अधिसूचना २३ आॅगस्ट रोजीप्रसिध्द होणार आहे. २४ आॅगस्टला मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी अधिसभागृहात दुपारी २:३० वाजता आरक्षण सोडत होईल. त्याच दिवशी सांयकाळी ५ वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पुूरती मतदार यादी संबंधित महाविद्यालयांमध्ये संकेतस्थळ व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल.
मतदार यादीवर लेखी आक्षेप २६ आॅगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंतनोंदविता येतील. २७ आॅगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये अर्ज दाखल केले जातील. ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी होईल व सांयकाळी ५ वाजता यादी प्रसिद्ध होईल.
अर्जाबाबत आक्षेप ३ सप्टेंबरला सकाळी ११ ते ५ या वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या आक्षेपांची सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल व सायंकाळी ५ वाजता अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज माघार तर याच दिवशी सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ७ सप्टेंबरला मतदान होणार असून प्राचार्यांनी महाविद्यालयांचे वेळापत्रक लक्षात घेऊन सलग चार तास मतदानासाठी ठरवायाचे आहेत. त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी १३ व १४ रोजी अर्ज
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी अधिसूचना सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ व १४ सप्टेंबर सकाळी ११ ते ४:३० या वेळेत विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. २३ सप्टेंबरला महाविद्यालय, विद्यापीठ, शैक्षणिक विभाग येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होईल व निकाल जाहीर केला जाईल.
अभाविपतर्फे निर्णयाचे स्वागत
पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्रात महाविद्यालय परिसरात खुल्या महाविद्यालयीन निवडणुका यावर्षी होणार आहेत. अनेक वर्षांपासून विद्यार्थी परिषदेने या मागणीसाठी आंदोलने केली आहेत. अखेर नवीन विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयात खुल्या महाविद्यालयीन निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचे अभाविप स्वागत करते. या निवडणुकीतुन नवीन सामान्य विद्यार्थी नेतृत्व पुढे येण्यासाठी मदत होईल. अभाविप येणाºया कालावधी मध्ये या निवडणुका सुरळीतपणे पार पाडता येतील याच्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याचे महानगर मंत्री रितेश चौधरी यांनी म्हटले आहे.