ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 17:57 IST2023-04-10T17:56:09+5:302023-04-10T17:57:55+5:30
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.

ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर
कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यानुसार दि.२५ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून दि.१८ मे रोजी मतदान होणार आहे. मयतांसह अपात्र ठरलेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात सर्वाधिक जागा अमळनेर तर भुसावळ तालुक्यात एकमेव जागेसाठी निवडणुक होत आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात १४० पंचायतींच्या निवडणुका गेल्या वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता पोटनिवडणुका होत आहेत. त्यानुसार दि.२५ एप्रिल ते १ मेदरम्यान अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.दि.३ मे रोजी छाननी होणार असून दि.८ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि.१८ रोजी मतदान व दि.१९ रोजी मतमोजणी होणार आहे. तालुकानिहाय जागा अशा : मुक्ताईनगर ८, जामनेर ७, चाळीसगाव १४, रावेर ११, जळगाव ४, भुसावळ १, यावल १३, बोदवड २, पारोळा २, धरणगाव ४, पाचोरा ९, अमळनेर १५ व चोपडा ७.