‘सीए’चा पल्ला गाठायचा आहे - प्रांजल सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:58 PM2019-05-29T12:58:02+5:302019-05-29T12:58:10+5:30

नियमित अभ्यासाने तणाव जाणवला नाही

'CA' is about to reach the level | ‘सीए’चा पल्ला गाठायचा आहे - प्रांजल सोनवणे

‘सीए’चा पल्ला गाठायचा आहे - प्रांजल सोनवणे

Next

जळगाव : बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे आई-वडीलांसह शिक्षकांनाही मोठा आनंद झाला असून मला सीए व्हायचे आहे़ त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रांजल विलास सोनवणे या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना दिली़
बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला़ त्यात मू़जे़ महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजल सोनवणे ही ९६ टक्के गुण मिळविले. त्यानिमित्ताने ‘लोकमत’ने तिच्याशी संवाद साधला असता तिने अनुभव सांगितले़
बारावीचे वर्ष असल्यामुळे नियमित अभ्यास करायची़ त्यामुळे मी परीक्षा काळातही कुठलेही मानसिक दडपण घेतलेले नव्हते़ जे अभ्यासाचे नियोजन ठरले त्याचप्रमाणे अभ्यास करायची़ सुमारे पाच ते सहा तास अभ्यास व्हायचा़ अभ्यासासाठी काही अडचणी आल्यास महाविद्यालयातील शिक्षक तसेच आई व वडील देखील मदत करायचे़ आणि त्या मदतीमुळे मला यश संपादन करता आले आहे़
पदवीपर्यंतचे शिक्षण सातवीत असतानाच पूर्ण
मला सीए व्हायचे असून त्यासाठी आतापासून तयारीला लागली आहे़ १६ जून रोजी सीपीटीची परीक्षा आहे़ आता त्याचा अभ्यास देखील सुरू आहे़ तसेच मी अबॅकसच्या ११ लेव्हल सुध्दा उत्तीर्ण केल्या आहेत़ एकाप्रकारे मी माझे पदवी पर्यंतचे शिक्षण हे सातवीत असताना पूर्ण केले आहे, असे म्हणता येईल, असेहीप्रांजल म्हणाली़

Web Title: 'CA' is about to reach the level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव