सीए इंटरमिजीट परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:16+5:302021-09-22T04:19:16+5:30
जळगाव : दि इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्यावतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर ...
जळगाव : दि इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्यावतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जळगाव शहरातून सीए इंटरमिजिएटच्या नवीन कोर्सच्या दोन्ही ग्रुपमधून दीप पाचपांडे प्रथम तर अनुश्री चांदीवाल, द्वितीय तसेच जिमित बाझल हा तृतीय ठरला आहे.
दि इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे जुलै महिन्यात सीए इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा १९ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला आहे. शहरातून इंटरमिजिएट नवीन कोर्समधून पहिल्या ग्रुपसाठी एकूण ८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुस-या ग्रुपसाठी एकूण ६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच दोन्ही ग्रुपसाठी ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ २२ विद्यार्थ्यांनी पहिला ग्रुप उत्तीर्ण केला आहे तर केवळ ६ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत. त्याशिवाय सीए इंटरमिजिएट जुन्या कोर्समधून दुस-या ग्रुपसाठी एकूण ४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच दोन्ही ग्रुपसाठी १६ विद्यार्थ्यी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ दोन विद्यार्थी पहिला ग्रुप उत्तीर्ण झाले आहे. या यश मिळविणा-या विद्यार्थ्यांचे सीए शोखेचे अध्यक्ष सीए प्रशांत अग्रवाल व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.