सी.ए. शाखेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:41+5:302021-03-09T04:18:41+5:30
जळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडियाच्या जळगाव सी.ए. शाखेस आणि जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस २०२०-२१ या वर्षामध्ये ...
जळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडियाच्या जळगाव सी.ए. शाखेस आणि जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस २०२०-२१ या वर्षामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र, गुजरात, गोवा स्तरावरील (डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय) स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे जळगाव सी. ए. शाखेचे वर्ष २०२०-२१ चे अध्यक्ष सागर पाटणी यांनी घोषित केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने दरवर्षी डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या सी.ए. शाखांचा गौरव करण्यात येतो. वर्ष २०२०-२१ मध्ये जळगाव सी.ए. शाखेने सागर पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षभर शैक्षणिकदृष्ट्या विशेष उपक्रम राबविले. विविध तज्ज्ञांची व्याख्याने, ऑनलाइन वेबिनार, ऑनलाइन कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिर, योगा प्रशिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, गरजूंना मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निरीक्षण गृहामध्ये असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ग्रामीण भागातील मुलांसाठी ऑनलाइन करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित केले. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.
हा सन्मान मिळवण्यासाठी जळगाव सी.ए. शाखेचे व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत अग्रवाल, सौरभ लोढा, विकी बिर्ला, स्मिता बाफना यांचे सहकार्य लाभले, असे सागर पाटणी यांनी सांगितले.