सीएए, एनआरसी रद्द करा..... जळगावात संविधान बचाव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:30 PM2020-01-07T12:30:40+5:302020-01-07T12:30:56+5:30
विविध ५० संघटना सहभागी
जळगाव : संविधान नागरिक कृती समितीतर्फे ७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव देश बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली खान्देश मॉल येथून सकाळी निघणार असून त्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटला आहे. यामध्ये विविध ५० संघटना सहभागी होत आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ही रॅली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. रॅलीच्या मार्गावरची येणारी व जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरु राहणार आहे. नेहरु पुतळयाकडून येणारी व जाणारी वाहतुकही एकेरी मार्गाने सुरु राहणार आहे. तसेच दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकापर्यंत सर्व प्रकारची वाहतुक बंद असेल. महाबळकडून गावात येणाºया नागरिकांनी आकाशवाणी चौक, प्रभात चौक मार्गे यावे लागणार आहे.