कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्राला मंत्रीमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:29 PM2019-08-29T12:29:44+5:302019-08-29T12:32:25+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ...

 Cabinet approval for Poetry Siblings Study and Research Center | कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्राला मंत्रीमंडळाची मान्यता

कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्राला मंत्रीमंडळाची मान्यता

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़ यामुळे विद्यापीठाशी निगडीत सर्व घटकांमध्ये तसेच खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या केंद्रामुळे बहिणाबाईंच्या साहित्याचा सर्वांगाने अभ्यास होणार आहे.
गतवर्षी ११ आॅगस्टला विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार झाला. त्यानंतर ८ आॅक्टोबर, २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा विद्यापीठात साजरा झाला. या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या मागण्यांचे प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठवावेत. विद्यापीठाच्या पाठीशी सरकार उभे राहिल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने विकासाचे काही प्रस्ताव शासनाकडे सादर केले. डिसेंबर महिन्यात कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा केली होती.
काय असणार केंद्रामध्ये़़़
बहिणाबाईंच्या जीवनाविषयी व त्यांच्या कवितांविषयी माहिती देणारे केंद्र म्हणून कार्य करणे, बहिणाबाईंची माहिती देणारे दृकश्राव्य दालन उभारणे, कवितांवरील लेखांचे संकलन करणे, लेवाबोली- समाज संस्कृती यांच्या अभ्यासास प्रोत्साहन देणे, संबंधित विषयांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक उपक्रम आयोजित करणे अशी काही उद्दीष्टे हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने निर्धारित केली आहेत.
विद्यापीठाने या केंद्रासाठी नवीन पदनिर्मिती व त्यासाठी वित्तीय तरतूद मिळण्याची विनंती प्रस्तावात केली आहे.

अन् केंद्र स्थापन करण्यास मिळाली मंजुरी
८ मार्च, २०१९ ला कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र स्थापन करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तत्वत: मंजुरी दिली होती. त्यानुसार बुधवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या मंजुरीबद्दल कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहूलीकर यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले आहे़

Web Title:  Cabinet approval for Poetry Siblings Study and Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.