केबल कापली, म्हणून कटरने एकाचा गळाच कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:43+5:302021-08-28T04:21:43+5:30

अमळनेर : पैशाच्या वादातून वारंवार केबल कापत असल्याने, संतापात एका तरुणाचा कटरनेच गळा कापून खून करण्यात आला. ही थरारक ...

The cable cut, so the cutter cut the throat of one | केबल कापली, म्हणून कटरने एकाचा गळाच कापला

केबल कापली, म्हणून कटरने एकाचा गळाच कापला

Next

अमळनेर : पैशाच्या वादातून वारंवार केबल कापत असल्याने, संतापात एका तरुणाचा कटरनेच गळा कापून खून करण्यात आला. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या हश्मजी प्रेमजी व्यापारी संकुलात उघडकीस आली. या घटनेनंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी आरोपीला चोपडा येथून अटक केली.

प्रकाश उर्फ बापू दत्तू चौधरी(कुवर) (३५) असे या खून झालेल्या तरुणाचे तर कैलास पांडुरंग शिंगाणे असे आरोपीचे नाव आहे. हश्मजी प्रेमजी व्यापारी संकुलात सफाईसाठी कामगार गेल्यावर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच, पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्याचा चेहरा पाहताच, तो जुना पारधीवाडा येथील प्रकाश असल्याचे समजले. पोलिसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, रात्री प्रकाश चौधरी व कैलास शिंगाणे हे सोबत होते व त्यांनी सोबत दारू घेतल्याचीही माहिती मिळाली.

पोलिसांनी लागलीच कैलासचे घर गाठले. कैलास तिथून फरार झाला होता. कैलासने धुण्यासाठी टाकलेले कपडयांवर रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. अमळनेर येथून आरोपी कैलास हा चोपडा येथील शालकाकडे गेल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याला वेले गावानजीक एका शेतातून अटक केली.

कटरने गळा कापल्याची कबुली

प्रकाश हा आपल्याकडील केबल वारंवार कापत होता, त्यामुळे नुकसान होत होते. प्रकाशला याबाबत कोणाकडून तरी पैसे मिळत होते, असे समजते. कैलास त्याला २६ रोजी सोबत घेऊन भोईराज आइसक्रीम पार्लर या नपा संकुलातील पहिल्या मजल्यावर दुकानात घेऊन गेला. तिथे दोघे दारू प्यायले. यानंतर, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केबल कापण्याच्या कटरने त्याचा गळा कापून खून केला व कटर तापी नदीत फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली.

Web Title: The cable cut, so the cutter cut the throat of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.