मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे केबल चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 04:20 PM2019-05-12T16:20:02+5:302019-05-12T16:22:04+5:30
केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे.
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे.
यापूर्वी भांबदरा शेती शिवारातून सुमारे एक लाख किमतीच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी भोकरी व नरवेल शिवारातील सुमारे ७० शेतकºयांच्या तीन लाख किमतीच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना शनिवारी पहाटे नरवेल शिवारातील वायली रस्त्याने असलेल्या शेतातील केबल चोरुन चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
केबल चोरीचे सत्र सुरुच असून, पोलीस याकडे गांभिर्याने न घेता अवैद्य धंद्याच्या वसुलीत गुंतले असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. मोहन महाजन, राजेंद्र महाजन, नीळकंठ महाजन, प्रदीप महाजन, अशोक पाटील, कैलास घाटे, प्रकाश धनगर, शरद महाजन, विनोद महाजन, रवींद्र वाळकळ, विनोद दशरथ, बाळू कापडी, विजय पाटील यांच्यासह सुमारे ५० शेतकºयांच्या दोन लाख २५ हजार किमतीच्या केबल चोरीला गेल्या असल्याची तक्रार शेतक-यांनी दिली आहे. यापूर्वी गावातून आमदखाँ व प्रमोद पाटील यांच्या ट्रॅक्टरचे पार्ट चोरीला गेले होते. ९ एप्रिल रोजी गणेश साळुंके यांची पाण्याची मोटार त्यांच्या घराजवळून चोरीला गेली होती.
या चोºयांचा तपास अद्यापपर्यंत लागला नसताना केबल चोरीचे सत्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सध्या उन्हाळा असल्याने केळी पिकला पाण्याची नितांत गरज आहे. केबल चोरीला गेल्याने केळीला पाणीही देता येत नाही. रात्रीची गस्त पोलिसांनी वाढावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.