जि.प.अध्यक्षांच्या पीआरओंकडून ‘कॅफों’ना अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:05 PM2018-07-05T22:05:19+5:302018-07-05T22:08:05+5:30

कारवाईची मागणी

'Cafono' from Awami League President Pranab Mukherjee | जि.प.अध्यक्षांच्या पीआरओंकडून ‘कॅफों’ना अरेरावी

जि.प.अध्यक्षांच्या पीआरओंकडून ‘कॅफों’ना अरेरावी

Next
ठळक मुद्देनिषेध म्हणून लेखा कर्मचा:यांचे दिवसभर लेखणी बंद आंदोलनपत्रकारांना ‘कुंडली’ची माहिती देण्याची धमकी..
गाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पी. पी. केदार यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) नरेंद्र महाजन यांना अर्वाच्च भाषेत बोलून अरेरावी केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान याविरुद्ध लेखा कर्मचा:यांनी गुरुवारी लेखणी बंद आंदोलन करुन या घटनेचा निषेधही नोंदवला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी बुधवार, 4 रोजी कॅफो यांच्या दालनात जावून निधी खर्चाच्या नोंदवह्या, रोखवह्या व अखर्चित रक्कमा आदी माहितीची मागणी केली. ही माहिती देण्यात आली मात्र वार्षिक नियोजन सन 17-18 व सन 18-19 ची माहिती केली असता ती माहिती आपल्याकडे उपलब्ध नसून ती खाते प्रमुखांशी संबंधित असल्याने त्यांच्याकडून घ्यावी असे कॅफो महाजन यांनी सूचित केले. खाते प्रमुखांचे सहकार्य नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वार्षिक नियोजन आराखडा (वर्क कॅलेंडर) तयार करण्याचे आदेश दिले आहे. हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी खाते प्रमुखांची असताना ते खाते प्रमुखांनी अपेक्षेप्रमाणे न केल्याने कॅफो यांच्या सूचनेनुसार अर्थ विभागातील कर्मचा:यांनी विभागांमध्ये जाऊन सन 17-18 ची माहिती अद्यावत संकलीत केली आहे. या दरम्यान खाते प्रमुखांनी आवश्यक सहकार्य केले नाही. त्यामुळे यात बराच वेळ गेला. यामुळेच नियोजनाचे काम अर्थ विभागाचे असल्याची धारणा झाल्याचे समजते, त्यामुळे यापुढे खातेप्रमुखांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम लेखा विभाग करणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मराठे, उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या स्वाक्ष:या आहेत. दरम्यान या प्रकरणात शिवसेनेचे जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सकाळी केला. कामबंद आंदोलन न करता आपसात चर्चा करुन हा वाद मिटवावे, असे आवाहन त्यांनी केले परंतु कर्मचारी संतप्त असल्याने त्यांनी आपला निर्णय न बदलता कामबंद आंदोलन छेडून मुख्य कार्यकारी अधिका:यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधून केदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. केदार यांची नियुक्ती नेरी येथे आणि काम जळगावलाकेदार यांची नियुक्ती जामनेर तालुक्यातील नेरी येथे ग्रामविस्तार अधिकारी म्हणून आहे, मात्र ते काम जळगाव येथे जि. प. अध्यक्षांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून करीत आहेत. नियुक्तीच्या ठिकाणी ते खूप कमी थांबतात. याबाबत नागरिकांनी तक्रारी करुनही दखल घेतली नसल्याची ओरड यानिमित्ताने ऐकण्यास मिळाली. तसेच नियुक्ती एकीकडे आणि काम दुसरीकडे हा काय प्रकार आहे? याबाबतही प्रश्न जिल्हा परिषद वतरुळात उपस्थित केला जात आहे. पत्रकारांना ‘कुंडली’ची माहिती देण्याची धमकी.. यावेळी सोबत असलेल्या केदार यांनी कॅफो महाजन यांना उभे राहून सांगितले की, तुम्ही मॅडम यांना माहिती का देत नाही. अर्थ विभागातील गेल्या दोन वर्षाची पूर्ण कुंडली माङयाकडे आहे, मी पत्रकारांना ही माहिती देईल, असा दम भरत वाद घातला तसेच एकेरी भाषाही वापरल्याचे स्वत: महाजन यांनी पत्रकारांनाही सांगितले. मी नियोजनाबाबत माहिती घेण्यास कॅफोंकडे गेले होते. यावेळी केदारे हे माङया वतीने बोलले असता कॅफो यांनी तुम्ही बोलू नका असे सांगितले. त्यांना असे बोलने म्हणजे माझा अपमान आहे.-उज्ज्वला पाटील, जि.प. अध्यक्षा केदारे यांनी माङयाशी तावातावात बोलण्यास सुरुवात केली. तरीही मी त्यांना सांगितले की, तुम्ही बोलू नका. पीए आहेत त्यांना बोलू द्या. तरीही त्यांनी अरेरावी केली. पीआरओने त्यांच्याच मर्यादेत राहून काम करायला हवे. काही कर्मचा:यांसमोरच हा प्रकार घडला असून त्यांच्यातही याबद्दल तीव्र नाराजी आहे. -नरेंद्र महाजन, कॅफो

Web Title: 'Cafono' from Awami League President Pranab Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.