कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 01:23 PM2017-06-14T13:23:57+5:302017-06-14T13:23:57+5:30

वाघास काही शेतक:यांनी पाहीले असून वाघ दिसताच त्यांनी शेतातून पळ काढला

Calfskin caught by the tiger in Kolhannavi forest | कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा

कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा

Next

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 14 - यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारात तापी नदीच्या काठावरील शेतात  पट्टेदार वाघाने    वासराचा फडशा पाडला.  वाघास काही शेतक:यांनी पाहीले असून वाघ दिसताच त्यांनी शेतातून पळ काढला  यावल वनविभागाचे उपवनसरंक्षक एस.एस. दहिवले, प्रादेशिक वनविभाग यावल पश्चिमचे एम. डब्ल्यू. जाधव पथकासह दाखल झाले. शेतात मृत वासरूचा पंचनामा करण्यात आला आहे. वाघाच्या पायांचे ठसे घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याच जाधव यांनी सांगितले.
तापी नदीच्या काठावरील कोळन्हावी येथे नदीपात्रालगत   अरूण दगडू सोळुंके यांची केळीची बाग आहे.  सोळुंके यांचे भाऊ विलास व त्यांच्या प}ी मंगलाबाई सोळुंके काम करीत होत्या. केळी बागेतून गुरं जोरात पळताना दिसली व एका वासरूचे ओरडण्याचा आवाज त्यांना आला तेव्हा सोळुंके केळी बागेत शिरले मात्न, तेथे  भुरकट रंगाचा पट्टेदार वाघ वासरूवर हल्ला करताना दिसला तेव्हा वाघाला पाहून त्यांना धडकी भरली व त्यांनी प}ीसह शेतातून पळ काढत कोळन्हावी गाठले व घडलेली हकीकत पोलीस पाटील कैलास सोळुंकेंना सांगितली.  

Web Title: Calfskin caught by the tiger in Kolhannavi forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.