शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या मुलांनी लांबविला कॅमेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:06+5:302021-08-12T04:20:06+5:30

सिध्देश याला रविवारी सकाळी १० वाजता कोल्हे हिल्स येथे फोटो काढण्यासाठी बोलावून तिघांनी त्याला मारहाण करुन सव्वा लाख रुपये ...

The camera lengthened by the children taking the lessons of education | शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या मुलांनी लांबविला कॅमेरा

शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या मुलांनी लांबविला कॅमेरा

Next

सिध्देश याला रविवारी सकाळी १० वाजता कोल्हे हिल्स येथे फोटो काढण्यासाठी बोलावून तिघांनी त्याला मारहाण करुन सव्वा लाख रुपये किमतीचा कॅमेरा घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतील तिघे जण शिक्षण घेत असून शिक्षणाच्या वयातच त्यांनी गुन्हेगारी क्षेत्राकडे पाऊल टाकले. तिघांवर यापूर्वी एकही गुन्हा नाही. निव्वळ फोटो काढण्याची हौस म्हणून सिध्देशचा कॅमेरा हिसकावला आहे. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, तपासी अमलदार अनिल फेगडे, हवालदार सतीश हाळणारे, सुशील पाटील, विजय दुसाने, ललित पाटील, दिनेश पाटील, दीपक कोळी व प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला.

Web Title: The camera lengthened by the children taking the lessons of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.