पहूर पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:47 PM2018-11-28T21:47:27+5:302018-11-28T21:49:17+5:30
पहूरसह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम राबविली. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पहूर, ता.जामनेर : पहूरसह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम राबविली. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी कारवाईत पाळधी, वाकोद, चिलगाव व भारूडखेडा येथील दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवरून प्रभारी पोलीस अधिकाºयांविरूद्ध कारवाईचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या भीतीने पहूर पोलिसांनी अवैधधंद्याविरोधात वॉश आऊट मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार पाळधी, फत्तेपूर, तोंडापूर, चिलगांव, शेंदुर्णी, वाकोद, भारूडखेडा येथील दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त करीत कारवाई केली आहे. पहूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप चौधरी, जितेंद्र परदेशी, राजू पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर, ईश्वर देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पहूरसह परिसरातील अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.