मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 02:22 PM2020-05-01T14:22:15+5:302020-05-01T14:25:21+5:30
मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध जामठी ग्राम पंचायतीने मोहीम सुरू केली आहे.
जामठी येथे २० जणांना दंड
दोन हजार रुपये दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
जामठी, ता.बोदवड, जि. : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जामठी ग्रामपंचायतीने पहिल्या दिवशी शुक्रवारी २० नागरिकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामठी ग्रामपंचायत हद्दीत दि. १ ते ३ मे असे तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सरपंच कमलाबाई माळकर यांनी काढले आहे.
बोदवड शहरासह तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधावा, याबाबत सुरूवातीला जनजागृतीही करण्यात आली. त्यानंतर मास्क किंवा रूमाल न लावणाऱ्या नागरिकांविरूद्ध कारवाई सुरू केली.
कारवाई करताना ग्रामसेवक गोविंद राठोड व ग्रामपंचायत कर्मचारी विजय पाटील, पवन कोलते, विशाल ठाकूर, जितेंद्र पारधी, सचिन महाजन, विकास पाटील, राजेंद्र शेळके, राजू ठाकूर, ईश्वर वाणी उपस्थित होते.