संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 09:37 PM2020-02-03T21:37:04+5:302020-02-03T21:37:21+5:30
जळगाव - एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ ...
जळगाव- एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अभ्यासक्रम कुलगुरू यांनी नियुक्त केलेले प्रा़ डॉ़ धनंजय चौधरी, प्रा़डा़ॅ़ अमृतकर, प्रा़ महाजन यांच्या आदेशाने घेण्यात आल्याने त्याचा निवेदनातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे़ तर निवेदना त म्हटले की, फुले दाम्पत्य, छत्रपती शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षण व्यवस्थेचे दरवाजे उघडे केले़ त्यामुळे छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासक्रम वगळून संघ विचारधारा असलेला तसेच हिंदू महासभा असेल अभ्यासक्रम मागील वर्षी प्रताप महाविद्यालय येथे निर्णय घेण्यात आला हा निर्णय घेत असताना कुलगुरू नियुक्त अभ्यास मंडळ सदस्य डॉ़ धनंजय चौधरी, डॉ़अमृतकर, डॉ़ महाजन यांच्यासह विद्यापीठातील इतिहासाचे ६० प्राध्यापक हजर होते़ तसेच अभ्यास मंडळावर निवडून आलेले प्रतिनिधी होते़ तर संघ प्रणित अभ्यासक्रम घेण्यात आला आहे़ हा अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा तसेच विद्यापीठातील इतिहासातील अभ्यासक्रमातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज महाराज यांचा अभ्यासक्रमात परत समाविष्ट न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, इशारा देण्यात आला आहे़ यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादि विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेचे अॅड़ कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भुषण भदाणे, रोहन सोनवणे, कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, अॅड़ विलास गिरासे, अक्षय वंजारी, गौरव पाटील आदींची उपस्थिती होती.