मनपाचा गाळे लिलाव करण्याबाबतचा ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:24+5:302021-08-12T04:19:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील भाडे न भरलेल्या गाळेधारकांचे गाळे जप्त करून, ते लिलाव करण्याबाबतचा ...

Cancel the decision of the corporation to auction the floor | मनपाचा गाळे लिलाव करण्याबाबतचा ठराव रद्द करा

मनपाचा गाळे लिलाव करण्याबाबतचा ठराव रद्द करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील भाडे न भरलेल्या गाळेधारकांचे गाळे जप्त करून, ते लिलाव करण्याबाबतचा ठराव १२ मे रोजी महासभेत करण्यात आला होता. हा ठराव अन्यायकारक असून, अनेक बाबी स्पष्ट नसल्याचे सांगत गाळेधारक संघटनेने हा ठराव रद्द करण्यात यावा यासाठी नगरविकास मंत्रालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी याबाबत गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून, याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

मनपा प्रशासनाने एकीकडे मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल करण्यासाठी मोहिम सुरु केली असताना, दुसरीकडे गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. मंगळवारी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी मुंबई येथे पाचोरा चे आमदार किशोर पाटील यांच्या समवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच गाळेधारकांचा प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.

आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घ्या - नगरविकास मंत्र्यांचा आयुक्तांना सूचना

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळेधारकांची बाजू ऐकून घेत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच गाळे प्रश्नी मनपाचे नुकसान होणार नाही व गाळेधारकांवर अन्यायदेखील होणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयात देखील बदल करण्याचे आश्वासन देखील नगरविकास मंत्र्यांनी दिल्याची माहिती गाळेधारकांनी दिली. दरम्यान, गाळेधारकांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीदेखील या प्रकरणी भेट घेतली आहे.

जुन्या बी.जे.मार्केटमधून ५४ लाखांची वसुली

मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची वसुलीची मोहिम सुरुच ठेवली असून, मंगळवारी जुन्या बी.जे.मार्केटमधून मनपाने ५४ लाखांची वसुली केली आहे. उपायुक्त संतोष वाहुळे व प्रशांत पाटील यांच्या पथकाकडून ही वसुली करण्यात आली आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मनपाने पुन्हा थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, ही रक्कम वसुल न झाल्यास गाळे सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Cancel the decision of the corporation to auction the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.