साध्वी प्रज्ञासिंह यांची लोकसभेची उमेदवारी रद्द करा, जळगावात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:24 PM2019-04-21T12:24:17+5:302019-04-21T12:24:40+5:30

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

Cancel Sadhvi Pragya Singh's candidature for Lok Sabha, Jalgaon ban | साध्वी प्रज्ञासिंह यांची लोकसभेची उमेदवारी रद्द करा, जळगावात निषेध

साध्वी प्रज्ञासिंह यांची लोकसभेची उमेदवारी रद्द करा, जळगावात निषेध

Next

जळगाव- मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाºया भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव येथे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन जिल्हाअधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे सुतक सुटले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असताना जळगाव येथेही शनिवारी जिल्हा मुस्लीम मानियार बिरादारी व जळगावकर नागरिकांच्यावतीने जिल्हा प्रशासनास निषेधाचे निवेदन देण्यात आले. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिक एकत्र आले. या वेळी प्रा. शेखर सोनाळकर यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी निवेदनाचे सामूहिक वाचन केले. मुख्य निवडणूक अधिकाºयांंनी साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची व त्यांचा जामीन ज्या कारणासाठी देण्यात आला आहे ते कारण आता नसल्याने जामीनसुद्धा रद्द करण्याचे आदेश संबंधिताना द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निषेधासाठी एक तासापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्यानुसार मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले. या वेळी जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी गृह विभागाचे प्रमुख रवी मोरे यांनी हे निवेदन स्वीकारले.
या वेळी प्रा. सोनाळकर, फारुक शेख यांच्यासह करीम सालार, वासंती दिघे, प्रा.डॉ. सी.पी. लभाणे, प्रा. देवेंद्र इंगळे, वैशाली पाटील, अंजुम रिझवी, रईस बागवान, अश्फाक पिंजारी, सतीश सुर्वे, अ‍ॅड. इम्रान हुसेन, डॉ. रिझवान खाटीक, ऐनोद्दीन शेख, नईम शेख, ताहेर शेख, अब्दुल रउफ, मुकेश पाटील, सीताराम देवरे, सुधाकर पाटील, साबीर शाह, दानिश अहेमद, कासीम उमर, फहिम पटेल, नईम खाटीक, रहीम तडवी, पीयूष तोडकर, सय्यद हारून, आकाश चौधरी, विकास पाटील, फिरोज पिंजारी, मुज्झमिल शेख, हारूण शेख, अन्वर शेख, सलमान खाटीक, मझहर पठाण, रियाझ काकर, कौसर शेख, सुभाष कोळी, शफी पेंटर, मोहम्मद शफी, रफिक मजीद, वसीम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Cancel Sadhvi Pragya Singh's candidature for Lok Sabha, Jalgaon ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव