जळगावात जि.प. शाळेच्या बेंचेसची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:18 PM2018-04-20T13:18:27+5:302018-04-20T13:18:27+5:30

वादात सापडल्याने निर्णय

cancel the tender process | जळगावात जि.प. शाळेच्या बेंचेसची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस

जळगावात जि.प. शाळेच्या बेंचेसची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस

Next
ठळक मुद्दे७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेसअटी शर्ती तपासून निर्णय

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० - मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांना प्लॅस्टिकचे पॉलिमर बँचेस पुरविण्याची निविदा वादात सापडल्याने व तक्रारी येत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केली आहे. अटी शर्ती डावलून काढण्यात आलेल्या या निविदेत आतापर्यंत तीन कंत्राटदारांनी बेंचेसचे नमुने शिक्षण विभागाकडे सादर केले आहे.
९७ लाखांच्या कामांसाठी निविदा ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर एका प्रतिस्पर्धी निविदाधारकाने थेट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आमदारांनी देखील निविदा रद्द करण्याची मागणी केल्याने ही प्रक्रिया वांध्यात सापडली.
७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेस
जिल्ह्यातील ७ तालुक्यातील शाळांना बँचेस वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील १० शाळांना प्रती शाळा २५ पॉलिमर बँचेस मिळणार आहे. एकंदरीत ७ तालुक्यातील ७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेस या कार्यक्रमांतर्गत वाटप करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या १० शाळांना २५० बँचेस देण्यात येणार आहे.
सीईओंच्या निर्णयाकडे लक्ष
जिल्हा परिषदेत ‘टेंडर मॅनेज’ करण्याचे प्रकरण गाजत असताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून सावध पवित्रा घेत तक्रारी येत असल्याने ही निविदा रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत पॉलिमर बेंचेससाठी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. मुदतीत निविदा प्रक्रियेत तृप्ती उद्योग, वरद इंटरप्राईजेस व रितेश स्टिल या तीन निविदाधारकांनी जि.प.च्या शिक्षण विभागाकडे बेचेंसचे नमुने सादर केले आहे.
दरम्यान, याबाबत शिक्षणधिकाºयांनी मात्र नमुनेच सादर झाले नसल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दालनाच्या अ‍ॅण्टी चेंबरमध्ये तीनही कंपन्यांचे नमुने ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले.
निविदा प्रक्रीया राबविताना संबंधित कंत्राटदाराचे नाव गुपीत ठेवले जाते. विशेषत: सर्वात कमी दराची जी निविदा असते त्यास काम दिले जाते. मात्र शिक्षण विभागाच्या निविदा प्रक्रियेत तीनही फर्मचे नाव व पत्ते निविदा मंजूर होण्याअगोदर उघड झाले आहे. तसेच शिवसेनेकडूनदेखील या निविदांबाबत आक्षेप घेतला असल्याचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
अटी शर्ती तपासून निर्णय घेऊ
पॉलिमर बेंचेस पुरविण्याच्या निविदेत तक्रारी आल्या असून शिक्षणाधिकाºयांनीदेखील निविदा रद्दची शिफारस केली आहे. येत्या दोन दिवसात अटी शर्ती तपासून या निविदेबाबत निर्णय घेवू तसेच याबाबत सीईओंशी चर्चा करून त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सांगितले.

Web Title: cancel the tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.