तीन तलाकबाबतचे विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरणार, जळगावात सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 07:38 PM2018-03-04T19:38:12+5:302018-03-04T19:39:53+5:30

कुल जमाती कौन्सिलतर्फे जळगावात मुस्लीम महिला अधिवेशन

Cancel the 'Three Divorce' | तीन तलाकबाबतचे विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरणार, जळगावात सरकारला इशारा

तीन तलाकबाबतचे विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरणार, जळगावात सरकारला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देपाच ठराव मंजूर

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - शरीअत-ए-इस्लामीमध्ये सरकारकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा निषेध करीत तीन तलाक विधेयक शासनाने रद्द करावे, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जळगाव येथे झालेल्या मुस्लीम महिलांच्या अधिवेशनात देण्यात आला. यावेळी एकूण पाच ठराव मंजूर करण्यात आले.
कुल जमाती कौन्सिलतर्फे ‘तहफ्फुज शरीअत’ या विषयावर रविवार, ४ मार्च रोजी मुस्लीम महिलांसाठी एक दिवसीय अधिवेशन सालारनगरातील इकरा स्कूलच्या प्रांगणात झाले. यावेळी शहरातील मुस्लीम महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या अधिवेशनात सरकारच्या हस्तक्षेपाचा निषेध करण्यात येऊन पाच ठराव मंजूर करण्यात आले, ते असे...
१) इस्लामी शरीअतमध्ये हस्तक्षेप नको
तीन तलाक बाबत सर्वोच्च न्यायालय व लोकसभेत पारीत करण्यात आलेल्या विधेयकाला इस्लामी शरीअतमध्ये हस्तक्षेप करणे आहे, असे हे अधिवेशन समजते. यात हस्तक्षेप नको.
२) विधेयक त्वरित रद्द करावे
हे अधिवेशन तीन तलाक बिलाचा जोरदार निषेध करीत असून सरकारने हे विधेयक त्वरित रद्द करावे.
३) तंटे शरीअत -ए-इस्लामीच्या नियमानुसार सोडवावे
मुस्लीम बंधू-भगिनींनी आपसातील तंटे, भांडणे शरीअत -ए-इस्लामीच्या नियमानुसार सोडवावे व त्यांनी प्रतिज्ञा करावी की, शरीअत -ए-इस्लामीवर पूर्णपणे अंमलबजावणी करू.
४) एकसंघ व्हावे
सर्वांनी आपले पंथ, जमात, संस्था या सर्वांपेक्षा एकसंघ व्हावे. सद्य स्थितीला न घाबरता त्यास लोकशाही मार्गाने सामोरे जावे.
५) रस्त्यावर उतरून निषेध करू
हे अधिवेशन सरकारला सूचित करते की, राज्यसभेत तीन तलाक विधेयक पारीत झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करू. शक्यतो मूक मोर्चा, धरणे आंदोलन, अधिवेशनाच्या माध्यमाने तीव्र निषेध करीत राहू.
असे पाच ठराव या अधिवेशनात करण्यात येऊन सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

Web Title: Cancel the 'Three Divorce'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव