डोईजड ठरणारा व्यावसाय कर रद्द करा - जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:21 AM2019-05-03T11:21:16+5:302019-05-03T11:21:55+5:30

व्यावसायिकांच्या समस्यांवर चर्चा

Cancellation of Commercial Tax Deducted - Demand for Jalgaon District Traders Corporation's Guardian Minister | डोईजड ठरणारा व्यावसाय कर रद्द करा - जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी

डोईजड ठरणारा व्यावसाय कर रद्द करा - जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी

Next

जळगाव : ‘एक देश, एक कर’ प्रणालीचा अवलंब करीत देशात जीएसटी कायदा लागू करण्यात आला असला तरी केवळ महाराष्ट्रात जनतेकडून व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) वसूल केला जात असल्याने हा कर रद्द करावा, यासह विविध मागण्या जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने बुधवारी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या.
जिल्हा व्यापारी महामंडळाने बुधवारी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी पाटील यांनी व्यावसायिकांशी तासभर चर्चा करीत सर्व समस्या समजून घेत त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया, उपाध्यक्ष युसुफ मकरा, अनिल कांकरिया, प्रवीण पगरिया, सचिन चोरडिया, संजय चोपडा आदी उपस्थित होते.
व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आलेल्या मागण्या
- देशात जीएसटी लागू करण्यात आल्यापासून जीएसटीचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढले आहे, असे असले तरी केवळ महाराष्ट्रात जनतेकडून व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) वसूल केला जातो, तो कर तातडीने रद्द करावा.
- आस्थापना परवाना व नुतनीकरणाच्या कायद्यात दुरूस्ती करीत १० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना परवाना आवश्यक नसल्याची सुधारणा करण्यात आली. १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेली मोजकीच आस्थापने असून शॉप अ‍ॅक्ट परवाना पध्दत पूर्णपणे रद्द करावी.
- कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट फी पूर्णपणे रद्द करावी.
- प्लॅस्टिक बंदीचा कायदा घाईघाईत लागू केला असून त्यानंतर त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. परंतू अद्यापही अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबाबत सखोल ज्ञान नसल्याने व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिक बंदीचा कायदा रद्द करून त्यात सुधारणा करीत पुन्हा नव्याने कायदा करण्यात यावा.
- जिल्हास्तरीय बँकांची समिती असलेल्या डीएलबीसी समितीमध्ये व्यापाºयांच्या एका सदस्याचा समावेश करण्यात यावा.
- जळगाव मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ््यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत असून कायद्याच्या अधीन राहून गाळेधारकांच्या हिताचा योग्य तो मार्ग काढावा.
- मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील प्रसाधनगृहांवर कब्जा करीत अतिक्रमण करून दुकाने बांधण्यात आली आहे. त्यामुळे अशी अतिक्रमीत दुकाने त्वरीत हटवून पुन्हा प्रसाधनगृहे उभारण्यात यावी.
- जळगाव जिल्हा एमआयडीसीसाठी अतिरिक्त जागेचे भूसंपादन करण्यात यावे.
- जळगाव विमानतळावर विमानसेवा नियमीतपणे सुरू करण्यात यावी. तसेच इतर विमानतळांवरून ये-जा करणाºया विमानांना जळगावात थांबा देण्यात यावा.
- जळगाव जिल्ह्यातील तरूणांसाठी एमआयडीसीत नवीन उद्योग आणावे.
- महाराष्ट्रात व्यावसायिक वापराच्या वीज दर सर्वाधिक असून इतर राज्यांप्रमाणे ते कमी करण्यात यावे.
- शहरातील रस्त्यांची आणि शहराबाहेर जाणाºया रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी.
- जळगाव मनपाने शहरात राबविलेली अतिक्रमण हटाव मोहिम चांगली होती. परंतु मनपाने अतिक्रमण हटविल्यानंतर त्या जागेवर कोणतीही दुरूस्ती अद्याप केली नाही. तसेच दुकानांची व ओट्याची हद्ददेखील निश्चित करून दिलेली नाही, ते निश्चित करून द्यावे.
- शहरातील समांतर रस्त्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.
- जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक समिती गठीत करून जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी त्यांच्यासोबत बैठक घ्यावी.
व्यवसाय कर रद्द करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू - पालकमंत्री
व्यवसाय कर रद्द करण्यासासंदर्भातील जिल्हा व्यापारी महामंडळाच्या मागणीबाबत उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, व्यवसाय करातून चार हजार करोड रुपयांचे उत्पन्न राज्याला मिळते. मात्र जीएसटीमधूनही उत्पन्न चांगले वाढले असल्याने व्यवसाय कर रद्द करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही दिली. या सोबतच शॉप अ‍ॅक्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट फी पूर्णपणे रद्द करण्याबाबत व इतरही मागण्यांबाबत विचार करू, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

Web Title: Cancellation of Commercial Tax Deducted - Demand for Jalgaon District Traders Corporation's Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव