कर्करोग तपासणी, अनेक शासकीय कर्मचा-यांचे ‘मुख अस्वास्थ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:28 PM2017-12-28T12:28:08+5:302017-12-28T12:45:53+5:30
रोज आढळताय पाच ते सहा संशयित
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28- शासन आदेशानुसार विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या ‘मुख स्वास्थ अभियान’ अंतर्गत कर्करोग तपासणीत पाच ते सहा कर्मचा-यांमध्ये रोगाची प्राथमिक लक्षणे आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आदेशानुसार 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचा:यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. ‘मुख स्वास्थ अभियान’ या योजनेतून ही तपासणी केली जात आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील दंत विभागाचे एक पथक यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन ही तपासणी करून संशयित आढळल्यास त्याची प्रथम जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील तपासणी व नंतर गरज पडल्यास शस्त्रक्रिया असे टप्पे नियोजित करण्यात आले आहेत.
अशी होतेय तपासणी
या अभियानात कर्मचा-याच्या तोंडात पांढरा, लाल चट्टा आहे काय?, तोंड उघडताना त्याला काही त्रास होतोय काय? याची बारकाईने तपासणी केली जाते आहे. हे अभियान बुधवार व गुरूवार असे दोन दिवस महापालिकेत राबविले जात आहे. पहिल्या दिवशी 70 कर्मचा:यांची तपासणी करण्यात आली. यात तिघांना पुढील तपासणीच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या वतीने कर्मचा:यांची ही तपासणी मोफत केली जात आहे. कर्मचा:यास कर्करोग असल्याचे लक्षात आल्यास कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निलेश चांडक हे या रूग्णावर जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत उपचार करतील, असेही सूत्रांनी सांगितले.
30 रोजी समारोपाचा कार्यक्रम
हे अभियान जिल्हा सामान्य रूग्णालयातील दंत रोग विभागामार्फत सुरू आहे. विभागाचे एक पथक विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन ही तपासणी करत आहे. मुखाच्या कर्करोगाची मुक्ती याद्वारे व्हावी असे प्रय} असल्याचे सूत्रांनी सांगितले.
31 रोजी या अभियानाचा समारोप आहे. मात्र या दिवशी रविवार असल्याने एक दिवस अगोदर म्हणजे 30 रोजी एक कार्यक्रम घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दंत विभागाच्या प्रमुख डॉ. संपदा गोस्वामी, यांच्या नेतृत्वखाली डॉ. क्षितीज पवार, डॉ. गोल्डी चावला, डॉ. मुकेश देशमुख अन्य सहकारी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
एस.टी. महामंडळात जास्त संशयित
एस.टी. महामंडळातील कर्मचा:यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत कर्करोगाची लक्षणे जास्त आढळून आल्याची माहिती तपासणी करणा:या सूत्रांनी दिली. यात प्रामुख्याने तोंडात पांढरे, लाल डाग आढळून आलेत. ही कर्करोगाची सुरूवात असल्याने धोक्याची घंटा ओळखून तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन तत्काळ बंद करण्याच्या सूचना या कर्मचा:यांना देण्यात आल्या. एस.टी. कंडक्टर, चालक यांच्या तपासणीत हा प्रकार जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या विभागांमध्ये केली तपासणी
महसूल विभाग, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, कृषि विभाग, वन विभाग, प्रदुषण नियंत्रण महामंडळ, महिला बालकल्याण, जिल्हा परिषद व आता महापालिकेत हे तपासणी अभियान सुरू आहे.
हजारावर कर्मचा-यांची तपासणी
या अभियानात विविध विभागांमधील एक हजार ते बाराशे कर्मचा-यांची आतार्पयत तपासणी झाली आहे.