चाळीसगावात साडेतीनशे महिलांची कॅन्सर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:29 AM2018-10-01T01:29:06+5:302018-10-01T01:33:08+5:30
चाळीसगाव येथील मारवाडी युवा मंचतर्फे शहरातील तब्बल साडे तिनशे महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. त्याबद्दल नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मंचचे कौतुक केले
चाळीसगाव : संपूर्ण जगात आज कॅन्सरची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ घातली आहे. त्यातच महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्तनाचे कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर याबाबत महिलांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. आजच्या शिबिरात मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली तपासणी करून घ्यावी, ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या मारवाडी युवा मंचचा हा उपक्रम अभिनंदनीय असल्याची भावना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.
मारवाडी युवा मंचच्या वतीने शहरातील बापजी रुग्णालयाच्या आवारात तीन दिवसीय मेमोग्राफी व पॅपस्मिअर कॅन्सर तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांची तीन दिवस तपासणी करण्यात आली. यात साडे तीनशे महिलांची तपासणी करण्यात आली. श्री पद्मावती वात्सल्य निधी ट्रस्ट , जैन डॉक्टर असोसिएशन चाळीसगाव मारवाडी युवा मंच तसेच पूनम फरसाणचे संजय अग्रावत, डॉ . सुवालाल छाजेड फाउंडेशन यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. दररोज फक्त शंभर महिलांची तपासणी शक्य असल्याने शहरातील विविध भागातील महिलांची तपासणी करण्यात आली. गेल्या तीन दिवसात ७२ महिलांची मॅमोग्राफी तर २०२ महिलांची पॅपस्मिअर कॅन्सर तपासणी निशुल्क करण्यात आली. या उपक्रमासाठी पद्मावती वासल्य ट्रस्ट अध्यक्ष दिपा शहा, रेखा मोमाया, नीलम मोमाया, हेमल पोलडिया, सुनीता कासार यांनी परिश्रम घेतले तर तपासणी शिबिराचा समारोप बाबजी ट्रस्टचे अध्यक्ष नरेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जैन असोसिएशनचे डॉ. अशोक जैन (आचलिया) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष समकित छाजेड, समितीचे सचिव पंकज दायमा सदस्य संजय अग्रावत, योगेश खंडेलवाल, अजय जोशी, प्रमोद दायमा, मनोज चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, सुनील वाणी, जितेंद्र राजपूत हेमलता शर्मा, योगिता छाजेड , धीरज लोढाया, नमिता अग्रावत , डॉ ईश्वर खाबिया आदींनी परिश्रम घेतले.