पोलीस भरतीसाठी बुध्दीमत्तेचे प्रश्न सोडवितांना उमेदवारांचा लागला कस

By admin | Published: April 9, 2017 03:48 PM2017-04-09T15:48:46+5:302017-04-09T15:48:46+5:30

जिल्हा पोलीस दलातर्फे 84 पदासाठी मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची रविवारी सकाळी 7़30 वाजता पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची लेखी परिक्षा पार पडली़

The candidates started raising questions while recruiting intelligentsia for recruitment | पोलीस भरतीसाठी बुध्दीमत्तेचे प्रश्न सोडवितांना उमेदवारांचा लागला कस

पोलीस भरतीसाठी बुध्दीमत्तेचे प्रश्न सोडवितांना उमेदवारांचा लागला कस

Next
>जळगाव,दि.9- जिल्हा पोलीस दलातर्फे 84 पदासाठी मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची रविवारी सकाळी 7़30 वाजता पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची लेखी परिक्षा पार पडली़ पेपरमधील बुध्दीमत्तेच्या प्रश्न सोडवितांना उमेदवारांचा चांगला कस लागला़ या व्यतिरिक्त पेपर सोपा गेला असल्याची प्रतिक्रिया तरूण-तरूणींनी व्यक्त केली़ सोपा पेपर असल्याने त्यापध्दतीने मेरीटही वाढून लागेल असा अंदाजही उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला़
जिल्हा पोलीस दलातर्फे मैदान चाचणीपात्र उमेदवारांची मेरीटनिहाय यादी लावण्यात आली होती़ त्यानुसार मेरीटमध्ये आलेल्या उमेदवारांना रविवारी लेखी परिक्षेसाठी बोलाविण्यात आले होत़ेसकाळी 7़30 ते 9 या वेळात 100 गुणांची लेखी परिक्षा पार पडली़
उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांना सकाळी 5 वाजता बोलाविण्यात आले होत़़े यासाठी पोलीस बास्केटबॉलच्या मैदानावर सर्व उमदेवारांना एकत्र करण्यात आल़े येथून ए, बी, सी, डी नुसार उमेदवारांचे गृप केल़े त्या-त्या गृपनुसार उमेदवारांना सोडण्यात आल़े 
पोलीस विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रवेशपत्रा व्यतिरिक्त रूमाल, पाकीट यासह जवळ असलेला पेन सुध्दा उमदेवारांकडून जमा करण्यात आल़े कवायत मैदानावरच परिक्षेपूर्वी उमेदवारांना पोलीस विभागातर्फे पेन वितरीत करण्यात आल़े 

Web Title: The candidates started raising questions while recruiting intelligentsia for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.