नांदुरा येथे अंत्ययात्रेला जाताना जळगाव येथे कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:23 PM2018-03-13T13:23:40+5:302018-03-13T13:23:40+5:30

मालवाहू वाहनाची धडक

Car accidents in Jalgaon | नांदुरा येथे अंत्ययात्रेला जाताना जळगाव येथे कारला अपघात

नांदुरा येथे अंत्ययात्रेला जाताना जळगाव येथे कारला अपघात

Next
ठळक मुद्देअपघातग्रस्त कार पोलिस स्टेशनलाजाणा-या वाहनधारकांनी घटनास्थळी धाव

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - नांदुरा येथे अंत्ययात्रेसाठी जाणाºया कुटुंबाच्या कारला मागून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातस्थळी गर्दी झाल्याचे पाहून जखमीला दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन आकाशवाणी चौकात उतरवून धडक देणाºया वाहनचालकाने पळ काढला. रविवारी रात्री अकरा वाजता महामार्गावर शिवकॉलनी पुलाजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अतुल सुरेश बोरसे (रा.शहादा, जि.धुळे) हे सिमा मनोज खंडेलवाल व त्यांच्या दोन मुलांना घेऊन नांदुरा येथे कारने (क्र.एम.एच.३९ जे.९२०४) अंत्ययात्रेसाठी जात असताना महामार्गावर शिव कॉलनीच्या उड्डाणपुलानजीक रविवारी रात्री अकरा वाजता मागून भरधाव वेगाने मालवाहू वाहनाने (क्र.एम.एच. १७ बी.डी. ५९०३) जोरदार धडक दिली. त्यात कारच्या मागील भागाचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातात सिमा खंडेलवाल यांना दुखापत झाली.
अपघात होताच रस्त्यावरुन जाणा-या वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे मालवाहू वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन लावले.
यावेळी कार चालक अतुल बोरसे यांनी त्याच्या वाहनाची चावी काढून घेतली. यावेळी काही जणांनी मध्यस्थी करुन जखमी महिलेला दवाखान्यात घेऊन जा म्हणून सल्ला दिला. त्याचा फायदा घेत चालकाने जखमी महिलेला त्याच्या वाहनात बसवून आकाशवाणी चौकात उतरविले. वाहन रस्त्याच्या कडेला लावतो असे सांगून तेथून पळ काढला. दरम्यान अपघातग्रस्त कार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणण्यात आली होती.
खंडेलवाल कुटुंब दुस-या वाहनाने रवाना
खासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर खंडेलवाल कुटुंब दुसºया वाहनाने नांदूरा येथे रवाना झाले तर चालक बोरसे यांनी कार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेली. तेथे मालवाहू वाहनाच्या चालकाविरुध्द तक्रार दिल्याने रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: Car accidents in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.