धावत्या ट्रकने दिलेल्या धडकेत कारची समोरच्या ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:49+5:302021-04-06T04:14:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महामार्गाच्या कडेला थांबलेल्या कारला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ही ...

The car collided with the truck in front of it | धावत्या ट्रकने दिलेल्या धडकेत कारची समोरच्या ट्रकला धडक

धावत्या ट्रकने दिलेल्या धडकेत कारची समोरच्या ट्रकला धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महामार्गाच्या कडेला थांबलेल्या कारला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ही कार पुढे असलेल्या ट्रकमध्ये गेल्याने तिचा चक्काचूर झाला, तर एअरबॅग उघडल्याने कारमधील दोघे जण बालंबाल बचावले. हा विचित्र अपघात सोमवारी सकाळी ९ वाजता महामार्गावरील पाळधी बायपासवर झाला.

जळगाव येथील पोलीस दलातील माजी कर्मचारी मनोज सुरवाडे व आणखी एक जण सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारने (क्र. एमएच.१५.जीएक्स.५५५५) धरणगावकडे जात होते. पाळधी बायपासवर खेडी कढोलीफाट्यावर त्यांनी कार रस्त्याच्या कडेला थांबवली होती. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र. एमएच.१९.झेड.४५२६) कारला मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, चारचाकी पुढील ट्रकमध्ये (क्र.एमएच.१८.बीए.९४४१) घुसून चक्काचूर झाली.

दैव बलवत्तर म्हणून बचावले

दैव बलवत्तर म्हणून कारमधील मनोज सुरवाडे व सहकारी दोन्ही बचावले. एअरबॅग वेळेवर उघडल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली नाही. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून प्रथमोपचार करण्यात आले आहे.

ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढले कारमधून दोघांना बाहेर

अपघातात चारचाकी चक्काचूर झाल्याने मनोज सुरवाडे व सहकारी गाडीतच फसलेले होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर चंदनकर, किरण सपकाळे, दत्तात्रेय ठाकरे, उमेश भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. ट्रॅक्टरच्या मदतीने गाडीचा दरवाजा आणि इतर भंगार बाजूला करून अर्ध्या तासाने मनोज सुरवाडे यांना बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत.

Web Title: The car collided with the truck in front of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.