यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ कारने अचानक पेट घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:12 PM2019-01-05T18:12:27+5:302019-01-05T18:14:02+5:30

यावल तालुक्यातील गिरडगाव येथे महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी धावती कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

The car suddenly caught abruptly near Jirggaon in Yaval taluka | यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ कारने अचानक पेट घेतला

यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ कारने अचानक पेट घेतला

googlenewsNext
ठळक मुद्देजीवितहानी टळलीइंजिनमधून आगीच्या ज्वाला दिसताच प्रवासी उतरले खालीमहामार्गावरील भरदुपारची घटना

यावल, जि.जळगाव :  तालुक्यातील गिरडगाव येथे महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी धावती कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. कारने अचानक पेट घेताच ‘द बर्निंग कार’चे दृश्य दिसत होते.
बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील यावल-चोपडा रस्त्यावरील गिरडगाव गावाजवळ यावलकडून एमएच-१९-एएफ-५९८७ क्रमांकाची कार प्रवासी घेऊन येत होती. या वाहनात पाच प्रवासी होते. या कारने अचानक पेट घेण्यास सुरुवात केली. कारच्या इंजिनच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. तेव्हा आग लागल्याचे लक्षात येताच कारचालकाने कार थांबविली व सर्व प्रवासी कारमधून खाली उतरले. यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. ही कार यावलहून चोपडा मार्गे अमळनेर येथे जात होती.
परिसरातील नागरिकांसह अग्निशमन बंबाने विझविली. मात्र याआधीच कार जळून खाक झाली. घटनेचे वृत्त कळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
यावल येथील रहिवासी रेहानखान यांच्या मालकीची ही कार होती.

Web Title: The car suddenly caught abruptly near Jirggaon in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.