कोरोना बाधिताच्या मृतदेहाची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:38 AM2020-05-26T11:38:22+5:302020-05-26T11:38:33+5:30
जळगाव : आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे. कोरोना बाधितांशी नाही... असे आपले सरकारच सांगत आहे.. इथे मात्र सरकारी कर्मचारीच अंत्यसंस्कारासाठी ...
जळगाव : आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे. कोरोना बाधितांशी नाही... असे आपले सरकारच सांगत आहे.. इथे मात्र सरकारी कर्मचारीच अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या बाधिताच्या मृतदेहाची चक्क हेळसांड करीत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
जळगावात दोन दिवसांपूर्वी एका बधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शववाहिकेतून हा मृतदेह कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून नेरी नाका स्मशानभूमीत आणला. चौथाºयावर मृतदेह न ठेवता कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह दुरूनच स्ट्रेचरवरून फेकल्याचा हा व्हिडिओ इंडिया टीव्ही या दूरचित्रवाणीवरुन व्हायरल झाला आहे.
मृतदेहातून कसलेतरी द्रव झिरपत असल्याने असे करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे.
कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचेही बोलले जात आहे.
आयुक्त म्हणतात हा प्रकार गैर
यासंदर्भात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना असा प्रकार गैर असल्याचे म्हटले आहे.