करिअरबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:08+5:302021-07-19T04:13:08+5:30

जिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन यंत्र भेट जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँक फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ...

Career guidance to tenth graders | करिअरबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

करिअरबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next

जिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन यंत्र भेट

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँक फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयास नुकतेच दोन ऑक्सिजन यंत्र भेट देण्यात आले. यावेळी स्टेट बँक फाउंडेशनचे मुकेश कुमार सिंग यांनी फाउंडेशनतर्फे देशभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक शिरीष कोल्हे, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाचे उपप्रबंधक स्वप्नील मोरदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बेशिस्त प्रवाशांवर कारवाईची मागणी

जळगाव : रेल्वेतून प्रवास करताना दरवाजात बसण्यास मनाई असतानाही अनेक प्रवासी दरवाजात बसून प्रवास करीत आहेत. यामुळे गाडीतून पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. असे असताना रेल्वे गाडीत सुरक्षेसाठी असलेल्या रेल्वे पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

विक्रेत्यांकडून रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन

जळगाव : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरील सर्व विक्रेत्यांना ‘नो बिल-नो पेमेंट’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वस्तूच्या विक्रीवर ग्राहकांना बिल देणे बंधनकारक केले आहे, तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेशदेखील रेल्वे बोर्डाने दिले आहेत. मात्र, जळगाव स्टेशनवरील बहुतांश विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन करण्यात येत नसून, रेल्वे प्रशासनाकडूनही या विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

अखेर स्टेशनसमोर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात

जळगाव : रेल्वे स्टेशनसमोर रात्री दहानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, स्टेशनवरून येणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच रात्रीच्या वेळी या हातगाड्यांवरील गर्दीमुळे वादविवाद घडण्याचे प्रकारही होत असल्यामुळे, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर रेल्वे प्रशासनाने स्टेशनबाहेर रात्री दहानंतर दररोज रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याचे ठरविले आहे.

Web Title: Career guidance to tenth graders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.