सावधान, कॉपी पुरवाल तर होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:09 PM2020-02-16T13:09:25+5:302020-02-16T13:09:58+5:30

दहावी-बारावी परीक्षेला उपद्रवी केंद्रांवर रोज बैठे पथक

Careful, if you provide a copy, there will be a crime | सावधान, कॉपी पुरवाल तर होणार गुन्हा दाखल

सावधान, कॉपी पुरवाल तर होणार गुन्हा दाखल

Next

जळगाव : दहावी-बारावीच्या परीक्षा काळात भरारी पथकांचे उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून यंदा जिल्ह्यातील ३३ उपद्रवी केंद्रांवर दररोज गटशिक्षणाधिकाऱ्यांचे बैठे पथक असेल़ त्याचबरोबर परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविताना कुणी आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिल्या आहेत़
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच दहावी-बारावी परीक्षेमध्ये होणाºया गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली़ अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम होते़ यावेळी़ जि़प़मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील, निरंतर शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे आदींची उपस्थिती होती़
तहसीलदार, गटविकास व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पथक नियुक्त
राज्यमंडळातर्फे जिल्हास्तरावर सात पथकांची नियुक्ती तर करण्यात आली असून तालुकास्तराव तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली़
जबाबदारी संभाळा
कॉपीमुक्त अभियान राबविण्यात यावे व परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होवू नये म्हणून प्रत्येक केंद्रसंचालकाने आपली जबाबदारी चोखपणे पूर्ण करावी,अशी सूचना कदम यांनी केली़
इंग्रजी, गणित, विज्ञानच्या पेपरला बैठे पथक
विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातील दहावी बारावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञानच्या पेपरला पूर्णवेळ केंद्रांवर भरारी पथकांचे बैठे पथक असतील़ तर उपद्रवी केंद्रांवर गटशिक्षणाधिकाºयांचे बैठे पथक दररोज असणार आहे़ तर इतर भरारी पथक हे परीक्षा केंद्रांना भेटी देतील़ तसेच कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राबाहेरून कुणी कॉपी पुरविताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या़

Web Title: Careful, if you provide a copy, there will be a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव