भुसावळ येथे मालवाहतूक गाडीचा डबा रूळावरून घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:27 AM2018-09-17T01:27:35+5:302018-09-17T01:28:09+5:30
सलग दुसऱ्या दिवशीही रुळावरुन चाक उतरण्याची घटना
भुसावळ, जि.जळगाव : लोखंडी पट्ट््याने भरलेल्या मालगाडीचे चाक रेल्वे रुळावरून उतरून २४ ते ३० फुटांपर्यंत घसरल्याची घटना येथील यार्डात गार्ड लोबी कॅबिन नंबर दहा ते अकराच्या मध्ये रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मालगाडी क्रमांक एक बॉक्स नंबर सेक्शन १९१४०४५२४७१ ही गाडी नागपूरकडून भोईसरकडे रेल्वेचे पट्ट्या घेऊन जात असताना यार्डातील गार्ड लॉबी जवळील जीसी-१० नंबर कॅबिनजवळ तसेच खांबा क्रमांक बीएसएल एमवायएल/६- ४८ ते ६-४९ यामध्ये डब्बा क्रमांक बोस्ट- एचएस एम १... १९१४०४५२४७१ हा डबा रुळावरून उतरून स्लीप पाटवर जवळपास २४ ते ३० फुटांपर्यंत चाक चालतच गेले. घटना रेल्वे रूळ क्रॉस करताना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती कळताच व शाखेतील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व दुर्घटना आपात्कालीन यानच्या सहाय्याने हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने फक्त वीस मिनिटात चाकाला रुळावर ठेवण्यात आले. घटना केबिन याडॉमध्ये झाली असल्याने याचा प्रवासी गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याची घडलेल्या घटना सलग दुसºया दिवशीही रेल्वेचे चाक रुळावरून घसरल्याने लागोपाठच्या घटनेने रेल्वे प्रशासनामध्ये चांगलीच तारांबळ उडाली आहे.
शनिवारी पाटलीपुत्र एक्सप्रेस अप गाडीचा इंजिनचा चाकही रूळावरून घसरला होता.
त्यानंतर सातत्याने दुसरी घटना घडली आहे.