10 लाखाचे दागिने घेऊन कारागिरांचा पोबारा

By admin | Published: March 23, 2017 12:18 AM2017-03-23T00:18:47+5:302017-03-23T00:18:47+5:30

धक्कादायक : दागिने बनविण्यासाठी दिले 350 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट;चौकशीसाठी गेलेल्या सराफालाच धमक्या

Carpenter with 10 lacs ornaments | 10 लाखाचे दागिने घेऊन कारागिरांचा पोबारा

10 लाखाचे दागिने घेऊन कारागिरांचा पोबारा

Next


जळगाव : दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे 350 ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात. ऑर्डरप्रमाणे दागिने घडविण्याचेही काम करतात. सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पश्चिम बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पश्चिम बंगाल) दोन्ही.ह.मु.सीताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणा:या कारागिरांशी भामरे यांची 9 वर्षापासून ओळख होती. त्यातून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले होते. 22 फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची ऑर्डर आली. त्यांनी राकेश व सुशांता या दोघांना त्यादिवशी दुकानात बोलावून घेतले व ईअर रिंग 3 ग्रॅम 53 जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह 35 ग्रॅमप्रमाणे 2 नग व मंगळसूत्र वाटी 2 ग्रॅम जोडी प्रमाणे 60 नग अशी ऑर्डर दिली. त्यासाठी 350 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट या दोघांच्या ताब्यात दिले होते.

बिस्कीट मिळताच ठोकली धूम
सोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली. ऑर्डर घेताना या दोघांनी भामरे यांना 4 ते 5 दिवसात सोने बनवून देतो असे सांगितले होते, त्यानुसार भामरे यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता दोघांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी गेले, मात्र तेथील सहका:यांनी हे दोन्हीजण कोणालाच काहीही न सांगता बाहेरगावी निघून गेल्याचे समजले.

पोलिसांकडे कथन केली घटना
पश्चिम बंगालमधून परत आल्यानंतर सचिन भामरे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन संपूर्ण घटना कथन केली. दरम्यान, भामरे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशीही समाजातील काही लोकांनी या विषयावर चर्चा केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Carpenter with 10 lacs ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.