हस्तांतरणाआधीच पाण्याच्या टाकीखालील भराव गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:35+5:302021-07-01T04:12:35+5:30
नूतन पिण्याच्या पाण्याच्या टाकीखालील भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. ठेकेदार हे सरपंचांकडे तुमच्या ताब्यात ही योजना घ्यावी यासाठी ...
नूतन पिण्याच्या पाण्याच्या टाकीखालील भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. ठेकेदार हे सरपंचांकडे तुमच्या ताब्यात ही योजना घ्यावी यासाठी तगादा लावत आहेत. मात्र, गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व कामे नवीन दुरुस्ती करून द्यावीत, अशा पवित्र्यात आहेत. म्हणून योजना हस्तांतरित होण्याआधी सर्व कामे अद्ययावत करून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
हस्तांतरित व्हायच्या आधीच पाण्याच्या टाकीखालील भराव वाहून गेला यावरून काम निकृष्ट झाले आहे हे दिसून येते. म्हणून निविदेनुसार सर्व कामे करून द्यावीत, नंतरच योजना स्वीकारली जाईल, अशा भूमिकेत सरपंच व ग्रामस्थ दिसत आहेत. सेनेचे चेतन पाटील, अमोल पाटील, बाबा पाटील, गिरीश पाटील यांनी हे काम क्लिअर करून द्यावे, अशी मागणी केली आहे.