कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 03:57 PM2023-03-23T15:57:35+5:302023-03-23T15:57:58+5:30

धरणगाव : बुधवारी घडला होता प्रकार, मंत्री सत्तार हे बुधवारी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते

Case against 13 persons who threw cotton on Agriculture Minister Abdul Sattar's vehicle | कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

धरणगाव, जि. जळगाव : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर कापूस फेकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न धरणगावात झाला होता. याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह १३ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री सत्तार हे बुधवारी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. ते धरणगावकडून जात असताना शिवसेना (ठाकरे) गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कापसाला भाव देण्याची मागणी करीत त्यांच्या वाहनावर कापूस फेकला होता.
याप्रकरणी गुलाबराव रतन वाघ, नीलेश सुरेश चौधरी, भागवत भगवान चौधरी, ॲड. शरद माळी, राजेंद्र पुंडलिक ठाकरे, विजय माधवराव पाटील, विलास परशुराम वाघ, महेद्र भास्कर चौधरी, भरत भगवान महाजन, गणेश मराठे, राहुल रघुनाथ महाजन, बापूचावदास महाजन (सर्व रा. धरणगाव), माधव राजधर सूर्यवंशी (रा. साकरे) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ मिलिंद सोनार यांनी याबाबत फिर्याद दिली.

आंदोलनासाठी पोलिस ठाण्याची कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आणि मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील करीत आहेत.

Web Title: Case against 13 persons who threw cotton on Agriculture Minister Abdul Sattar's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.