भुसावळ गोळीबार प्रकरणात पोलीस पूत्रासह तिघे जाळ्यात
By Admin | Published: June 29, 2017 12:57 PM2017-06-29T12:57:34+5:302017-06-29T12:57:34+5:30
भुसावळच्या भारत नगरासह पवन नगरात गोळीबार करून दहशत निर्माण करणा:या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात भुसावळ शहर पोलिसांना यश आले आह़े
गणेश वाघ/लोकमत
भुसावळ, दि.29 - भुसावळच्या भारत नगरासह पवन नगरात गोळीबार करून दहशत निर्माण करणा:या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात भुसावळ शहर पोलिसांना यश आले आह़े विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या संशयीतांमध्ये पोलीस पूत्रासह दोघा अट्टल गुन्हेगारांचा समावेश आह़े
रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अट्टल व हद्दपार आरोपी मुकेश भालेरावसह अन्य सहा जणांनी निखील झांबरे या तरुणावर गोळीबार करून जखमी केले होते. तर भारत नगरात हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून रहिवाशांमध्ये दहशत पसरवली होती़ आरोपींनी दोन घरांमध्ये जावून कुलरसह दरवाजाचे तसेच दुचाकीचे नुकसान केले होते. तर भाजी विक्रेत्यासह 11 वर्षीय लहान बालकावर बंदुक रोखली होती़
पोलीस पूत्रासह तीन अट्टल गुन्हेगार जाळ्यात
भुसावळ पोलिसांनी रणविर (राणू बॉक्सर) विजय इंगळे (रा.शांती नगर भुसावळ), करण किशन इंगळे (रा.राहुल नगर, भुसावळ), दीपक श्रावण लोखंडे (आरपीएफ बॅरेक जवळ, भुसावळ) या तिघांना ताब्यात घेतले. गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांची संशयीत आरोपींनी झोप उडवली होती़ स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांचे दहा पथक आरोपींच्या मागावर होत़े ताब्यात घेतलेल्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसली, तरी त्यांचा गोळीबार प्रकरणात सहभाग असल्याचा दाट संशय आह़े सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतल्या च्या वृत्ताला दुजोरा दिला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितल़े
दरम्यान, यापूर्वी श्यामल शशीकांत सपकाळे (कोळी) व सुशील इंगळे (खळवाडी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 1 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आह़े