फसवणूक प्रकरणी बढे पतसंस्थेच्या 11 कजर्दारांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: April 27, 2017 04:57 PM2017-04-27T16:57:45+5:302017-04-27T16:57:45+5:30

11 कजर्दारांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

In the case of cheating, crime against 11 loan defaulters | फसवणूक प्रकरणी बढे पतसंस्थेच्या 11 कजर्दारांविरुद्ध गुन्हा

फसवणूक प्रकरणी बढे पतसंस्थेच्या 11 कजर्दारांविरुद्ध गुन्हा

Next

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि़जळगाव, दि. 27 -  राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेची दोन कोटी 70 लाख 51 हजार 298 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 कजर्दारांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे कजर्दारांमध्ये खळबळ उडाली आह़े पुरेसे तारण न दिल्याचा व अपूर्ण कागदपत्र देऊन कर्ज थकवल्याचा ठपका आरोपी कजर्दारांवर ठेवण्यात आला आह़े
या प्रकरणी जिल्हा विशेष परीक्षक वर्ग- 1, सहकारी संस्था नंदुरबारचे योगीराजसिंग विठ्ठलसिंग राजपूत (वय 30, रा़नंदुरबार) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली़ संशयित आरोपी गोकुळ नारायण मोरे (कंडारी, ता. भुसावळ), शैलेंद्र प्रल्हाद नन्नवरे (अनिल नगर, फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ), सुरेश राजाराम पोतदार (भुसावळ), किशोर ज्ञानदेव चौधरी (भुसावळ), वसंतराव गोंडू झारखंडे (वराडसीम, ता. भुसावळ), राहुल देविदास चौधरी (भुसावळ), वर्षाबाई जयपाल कुकरेजा ( भुसावळ), देवीबाई हरीकुमार कुकरेजा (भुसावळ), मधुकर शिवाजी उगले (भुसावळ), राजू बुधोमल शर्मा (भुसावळ)  यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़
30 मार्च 2000 ते 27 एप्रिल 2017 दरम्यान आरोपींनी भुसावळ शहरातील सहकार नगरातील चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को़ऑप क्रेटीड सोसायटी लि़वरणगाव शाखेची दोन कोटी 70 लाख 51 हजार 298 रुपयांची फसवणूक केली़ 11 आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज घेताना अपूर्ण कागदपत्रे दिली तसेच पुरेसे तारण दिले नाहीत, करारनाम्याचे उल्लंघण करीत कर्जाची परतफेड न केल्याचे फिर्यादीत नमूद आह़े 

Web Title: In the case of cheating, crime against 11 loan defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.